Home वरोरा धक्कादायक :- विष्णू कष्टीची हत्त्या प्रकरणात पाच आरोपी ? शंभू चौधरीच्या बंड्यावर...

धक्कादायक :- विष्णू कष्टीची हत्त्या प्रकरणात पाच आरोपी ? शंभू चौधरीच्या बंड्यावर हत्त्या करून प्रेत झुडपात टाकले.

 

विष्णू कष्टी हत्त्येच्या दिवशी शंभू चौधरीच्या  मुख्य गेट जवळ रक्त पडून असल्याचे अनेकांनी बघितले पण पोलिसांची चुप्पी का?

वरोरा प्रतिनिधी :-

अवैध व्यवसायात लिप्त असणारा शंभू चौधरी हा विष्णू कष्टी प्रकरणात मुख्य आरोपी असताना सुद्धा पैशाच्या बळावर पोलीसांच्या अटकेपासून तो सुरक्षित आहे, मात्र तरी सुद्धा त्याच्या पापाचा घडा आता भरला असल्याने त्याला वरोरा पोलिस वाचविण्याचा प्रयत्न करीत असली तरी एलसीबी पथकाच्या तपासात त्याचे पितळ उघडे पडणार आहे कारण विष्णू कष्टी हत्त्या प्रकरणात केवळ दोन नाही तर चक्क पाच आरोपी असल्याचे आता स्पष्ट होणार आहे, परंतु वरोरा पोलिसांना ह्या सर्व बाबींची कल्पना असताना सुद्धा त्यांची हिंमत शंभू चौधरीला अटक करण्याची नाही हे आता स्पष्ट दिसत आहे.

राजस्थानी शंभू चौधरी यांचे खांबाडा फत्तेपूर येथे व इतरत्र ब्लास्टिण्गचे मोठे काम असून त्याच्या व्यवसायाशी पोलिसांचा नेहमीच सबंध येत असतो. एकीकडे विष्णू कष्टीची हत्त्या त्याच्या खांबाडा येथील बंड्यावर झाली व त्याचे प्रेत एका जवळच असलेल्या झुडपात टाकले असल्याचे दिसत आहे, एवढेच नव्हे तर ज्या दिवशी विष्णू कष्टी ची हत्त्या झाली त्या दिवशी त्याच्या बंड्या च्या मुख्य दाराजवळ रक्त सांडून असल्याचे अनेकांनी बघितले आहे, त्यामुळे विष्णू कष्टीची हत्त्या ही शंभू चौधरी व पाच लोकांनी मिळून केली याचे पक्के पुरावेच मिळत आहे, पण वरोरा पोलिसांनी तरीही शंभू चौधरी यांना सरक्षण देण्याचा जो प्रयत्न चालवीलेला आहे तो वरोरा पोलिसांच्याच अंगलट येण्याचे चिन्ह दिसत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी केली आहे व नवे पोलिस अधीक्षक यांना सुद्धा निवेदन दिले आहे, त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा एलसीबी पथकाकडे जाऊ शकतो, त्यामुळे स्थानिक पोलिस तपास अधिकारी यांचे शंभू चौधरी यांच्यासोबत असलेले हितसंबंध सुद्धा तपासले जाऊन त्या दोषी पोलिस अधिकारी यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे. आता पकडलेल्या दोन आरोपीसह ते पाच आरोपी कोण ? हे लवकरच कळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here