Home चंद्रपूर धक्कादायक :- संजय कंचर्लावार यांच्या साई हेरीटेज कॉंप्लेक्सच्या बांधकाची माहितीच मनपा मधून...

धक्कादायक :- संजय कंचर्लावार यांच्या साई हेरीटेज कॉंप्लेक्सच्या बांधकाची माहितीच मनपा मधून गायब?

 

वरोरा नाक्यावरील साई हेरीटेज कॉंप्लेक्सच्या बांधकामाबाबत मनपा कडे माहितीच नसल्याचे माहिती अधिकार पत्रातून निष्पन्न.

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग  २१

चंद्रपूर महानगर पालिकेत महापौर राखी कंचर्लावार यांच्या सत्ता काळात त्यांच्या पती व इतर नातेवाईकांनी केलेले मोक्याच्या जागेवरील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम आता समोर येत असून जिथे सर्वसामान्यांना कायद्याच्या धाक दाखवून अतिक्रमण व बांधकाम तोडणाचे आदेश देणाऱ्या महापौर आता त्यांच्या स्वतःच्या पतीच्या व नातेवाईकांचे अवैध अतिक्रमण व बांधकाम तोडणार का ? हा प्रश्न चंद्रपूर शहरातील जनता विचारत असताना आता तर चक्क त्यांचे पती यांची भागीदारी असणाऱ्या वरोरा नाका परिसरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या साई हेरीटेज कॉंप्लेक्सची बांधकाम परवानगी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी चंद्रपूर महानगरपालिकेत माहिती अधिकार अर्जाद्वारे मौजा – देवई गोविंदपूर रैय्यतवारी त.सा. क्र.११ चंद्रपूर सर्वे नं. १२०/३ वरोरा नाका साई हेरीटेज कॉंप्लेक्सची बांधकाम परवानगी बाबत विचारणा केली असता महानगर पालिकेने कार्यालयीन अभीलेखाची पडताळणी केली असता अपेक्षिलेली माहिती आढळून आली नाही अशी माहिती दिली, सदर साई हेरीटेज कॉम्पेक्स हे साई सुमन डेव्हलपर या संजय कंचर्लावार यांच्या भागीदारी मालकीचे आहे हे विशेष.

त्यानंतर दुसरा मुद्दा असा होता की इमारतीच्या बांधकामाच्या मान्यता प्राप्त नकाशाची माहिती प्रत. इमारतीच्या बांधकामाच्या मान्यता दिलेले आदेशाची माहिती प्रत व इमारतीच्या बांधकाम सुरु असतेवेळी व बांधकामास देण्यात आलेल्या नोटिसाची माहिती प्रत, याबाबत विचारणा केली असता मनपाने सदर बाबत कार्यालयीन अभिलेखाची पडताळणी केली असता माहिती आढळून आली नाही, तरी सदरबाबतची माहिती आपणास पुरविता येऊ शकत नाही. व सदरबाबत ची माहिती झोन क्र. १, मनपा, चंद्रपूर यांचेशी संबंधीत असल्याने त्यांचेशी संपर्क साधावा असे सुचविले आहे, यावरून महापौर राखी कंचर्लावार यांच्या नगरसेवक पतीच्या साई हेरीटेज कॉंप्लेक्सचे बांधकाम बेकायदेशीर व तत्कालीन नगरपालिका व महानगरपालिका यांच्या मंजूर नकाशा नुसार नसल्याचे शीद्ध होते, त्यामुळे सत्तेत असल्याने राखी व संजय कंचर्लावार यांची साई हेरीटेज कॉंप्लेक्सची इमारत चंद्रपूर महानगर पालिका प्रशासन वाचवीत असल्याचे चित्र आहे. महत्वाची बाब म्हणजे एकीकडे चंद्रपूर महानगरपालिकेला स्वच्छ व पारदर्शी प्रशासन देवू अशी घोषणा चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत देणाऱ्या भाजप नेते तथा माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची हीच का ती महानगरपालिका ? असा प्रश्न आता शहरातील जनता विचारू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here