Home गडचांदूर खळबळजनक :- गडचांदूरचे ठाणेदार यांची मोठा सुगंधीत तंबाखू तस्कर जयसुख यांच्यासह इतरांसोबत...

खळबळजनक :- गडचांदूरचे ठाणेदार यांची मोठा सुगंधीत तंबाखू तस्कर जयसुख यांच्यासह इतरांसोबत यारी ?

 

सुगंधीत तंबाखू, घुटका यापासून पोलिसांची लाखोंची हप्ताखोरी?

पोलीस पंचनामा भाग

 

गडचांदूर शहरात ठाणेदार गोपाल भारती यांच्या छत्रछायेत अवैध दारू तस्करी सह सुगंधीत तंबाखूची मोठी तस्करी बल्लारपूर येथील जयसुख द्वारे त्यांच्या काही फण्टर मार्फत होत आहे तर दुसरीकडे या अवैध सुगंधीत तंबाखूच्या धंद्यात हनीफ भाई, आशीफ किडिया, सरफराज किडिया, पुरुषोत्तम ठाकरे, सूरावार ब्रदर्स, अमजू भाई रहमान जीलाणी, इरफान दगडी इत्यादीनी सुद्धा ठाणेदार यांच्या “जीवो और जिने दो” म्हणत तेरी भी चुप और मेरीभी चुप या अघोषित करारा नुसार तस्करी जोरात आहे.

ठाणेदार भारती यांच्या भ्रष्ट कहाण्या जर बघितल्या तर त्यांनी खरंच “सदरक्षणाय खलनिग्रहनाय” या पोलीस ब्रीद वाक्याला सलामी दिली की तिलांजली दिली याचा शोध लागतो, सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनाचा नायनाट याचे भान नसलेले ठाणेदार भारती यांनी लाखोंच्या हप्ताखोरिने आपल्या पोलीस खात्याला नतभ्रष्ट केले व या गडचांदूर परिसरात अवैध धंद्याच्या पूर आणलाय असेच चित्र दिसत आहे. एकेकाळी गडचांदूर येथे दुकान चालविणाऱ्या जयसुख यांनी जेंव्हा आंध्र प्रदेशात घुटका बंदी होती तेव्हा गडचांदूर वरून मोठ्या प्रमाणात घूटका व सुगंधीत तंबाखूची तस्करी आंध्रात केली होती आणि आता तो डुब्लिकेट तंबाखू व घुटका विक्रीचा बादशहा झाला असून ठाणेदार भारती यांचा यार असल्याची माहिती आहे.तर इतर सुगंधीत तंबाखू विक्रेते काही काळातच कोट्याधीश झाले असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here