Home चंद्रपूर खळबळजनक :- चंद्रपूर मनपा प्रशासनाने लपवली महापौर राखी कंचर्लावार यांच्या घराच्या बांधकाम...

खळबळजनक :- चंद्रपूर मनपा प्रशासनाने लपवली महापौर राखी कंचर्लावार यांच्या घराच्या बांधकाम तक्रारीची माहिती ?

 

काँग्रेस नगरसेविका सुनिता लोढिया यांनी दिनांक 16/8/2017 ला आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीची प्रत गायब?

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग -23

चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर राखी कंचर्लावार यांच्या दावणीला अख्खे महानगरपालिका प्रशासन बांधले असल्याचा खळबळजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून त्यांच्या साई मंदिर वार्डातील घराचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची तक्रार त्याच प्रभागातील काँग्रेस नगरसेविका सुनिता लोढिया यानी चंद्रपूर मनपा आयुक्तांकडे दिनांक 16/8/2017 दिली असल्याची माहिती असून सुद्धा सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी याबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये मनपा प्रशासनाला माहिती मागितली होती, पण महानगरपालिका प्रशासनाने माहीती न देता ती लपवीण्यासाठी चक्क तक्रारकर्त्या अर्जदाराच्या अर्जाचा तपशील, अर्जदाराचे नाव, अर्जाचा दिनांक हा उलट माहिती अधिकारात माहिती मागणाऱ्या राजेश बेले यांना अर्जाद्वारे सूचित केले असल्याने महापौर राखी कंचर्लावार यांच्या दावणीला अख्खे महानगरपालिका प्रशासन असल्याचा प्रकार दिसत आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार हा भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर प्रकाशित होत असताना व महापौर कंचर्लावार यांच्या व नातेवाईकांच्या माध्यमातून शहराच्या मोक्याच्या जागेवर अतिक्रमण व अवैध बांधकाम संदर्भातील माहिती प्रकाशित होत असताना खरं तर महानगरपालिका प्रशासनाने आपल्या कामकाजात सुधारणा करून पारदर्शी कारभार करायला हवा होता पण आता तर माहिती अधिकारात माहिती मागणाऱ्या व्यक्तीलाच पत्र देवून तक्रारकर्त्या अर्जदाराच्या माहितीचा तपशील विचारल्या जातो म्हणजे चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन झोपेचे सोंग करीत आहे का ? हा प्रश्न पडतो, एरव्ही सुसंस्कृत पक्ष समजल्या जाणाऱ्या भाजप ची सत्ता महानगरपालिकेत असताना असा जर प्रकार होत असेल तर मग बाकीच्याकडून सर्वसामान्यांनी अपेक्षा ठेवायची कशी ? हा गंभीर प्रश्न असून येणाऱ्या समोरील निवडणुकीत या सर्व प्रश्नांचे उत्तर शहरातील जनता सत्ताधाऱ्यांना नक्कीच द्यावे लागेल एवढे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here