Home वरोरा वरोरा येथे मनसेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा २८ ऑक्टोबरला,

वरोरा येथे मनसेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा २८ ऑक्टोबरला,

 

मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरीय व शस्वी ऊद्दोजक रमेश राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार.

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी नुकतेच रेती माफियांना साथ देणाऱ्या महसूल प्रशासनाविरोधात टॉवरवर विरूगिरी आंदोलन करून तालुक्यातील प्रशासन व जनतेचे लक्ष वेधून घेतले होते व महसूल प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेवून मनसेच्या पूर्ण मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिले होते, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याने युवा कार्यकर्त्यांचा पक्षात ओघ सुरू झाला आहे, त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र सैनिक मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा दिनांक २८ ऒक्टोंबर ला बावने मंगल कार्यालय सभागृहात दुपारी १२.३० वाजता आयोजीत केला असून या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी हे उपस्थित राहणार आहे तर वरोरा येथील यशस्वी ऊद्दोजक रमेश राजूरकर यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे विदर्भ अध्यक्ष अतुल वांदिले, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड इत्यादींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मनसे महाराष्ट्र सैनिक मेळाव्याला वरोरा शहर व ग्रामीण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, तालुका अध्यक्ष वैभव डहाणे, तालुका संघटक जगदीश उर्फ वाळू लांडगे, शहर अध्यक्ष शरद मडावी, तालुका प्रशिद्धि प्रमुख मनोज जानवे, तालुका उपाध्यक्ष विशाल ढवस, विक्रम चंदनखेडे, संदीप दातारकर, शहर उपाध्यक्ष अजिंक्य नरडे, मोहसीण सय्यद, सौरभ खापणे,अमोल सातपुते, लक्ष्मीकांत थेरे, महिला सेना तालुका अध्यक्षा रेवती इंगळे, शहर अध्यक्षा वैशाली वानखेडे यांनी केले आहे.

Previous articleखळबळजनक :- चंद्रपूर मनपा प्रशासनाने लपवली महापौर राखी कंचर्लावार यांच्या घराच्या बांधकाम तक्रारीची माहिती ?
Next articleवरोरा येथे मनसेचा महाराष्ट्र सैनिक मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा २८ ऑक्टोबरला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here