Home भद्रावती खळबळजनक :- भद्रावतीमधे पटेल, वैद्य आणि शेखर रंगारी यांनी थाटला अवैध सुगंधीत...

खळबळजनक :- भद्रावतीमधे पटेल, वैद्य आणि शेखर रंगारी यांनी थाटला अवैध सुगंधीत तंबाखूचा व्यापार?

 

जिल्ह्यातील त्या मोठ्या सुगंधीत तंबाखू तस्करांसोबत अन्न औषधी प्रशासनाचे अर्थपूर्ण गुटरगु?

भद्रावती प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथील सुगंधीत तंबाखू तस्कर जयसूख ठक्कर चंद्रपूर येथील ठक्कर, पडोली येथील केजीएन ट्रेडर्सचे आरिफ कोळसावाला हे होलसेल सुगंधीत तंबाखूचे मोठे तस्कर असून भद्रावती शहरात जुनी बैंक ऑफ इंडिया जवळ पटेल यांच्या दुकानात तर झाडे प्लॉट येथे वैद्य यांच्या दुकानात व शेखर रंगारी यांच्या घरी मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखूची खुलेआम विक्री होत असल्याची माहिती आहे. असे असताना भद्रावती च्या या अवैध सुगंधीत विक्रीवर अन्न औषधी प्रशासन लक्ष देत नसेल असे नाही तर त्यांचे या अवैध सुगंधीत तंबाखू विक्री करणाऱ्या सोबत अर्थपूर्ण गुटरगु असल्याची चर्चा आहे.
भद्रावती शहरात खुलेआम खर्रा विक्री जोमात सुरू असून या कामामध्ये काही हवसे नवसे गवसे यांनी आपली दुकानदारी जोमात चालवलेली आहे. आता या अवैध सुगंधीत तंबाखू विक्रेत्यावर जिल्हास्तरीय प्रशासन लक्ष घालेल तरच यावर प्रतिबंध लागू शकतो असे जाणकारांचे मत आहे. भद्रावती मधे चालणाऱ्या या अवैध सुगंधीत तंबाखू संदर्भात प्रश्न काही राजकीय मंडळी कडून उचलले जाईल की हे प्रकरण इथेच संपविणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleकोरोना अपडेट :- जिल्ह्यात मागील 24 तासात 137 नव्याने पॉझिटिव्ह ; एका बाधिताचा मृत्यू.
Next articleअखेर पोलीस निरीक्षकांच्या बदल्यासह उपपोलिस निरीक्षकांच्या बदल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here