Home चंद्रपूर अखेर पोलीस निरीक्षकांच्या बदल्यासह उपपोलिस निरीक्षकांच्या बदल्या.

अखेर पोलीस निरीक्षकांच्या बदल्यासह उपपोलिस निरीक्षकांच्या बदल्या.

 

पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे दिले आदेश.

पोलीसनामा :-

चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या प्रलंबित होत्या त्या आता झाल्या असून पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या अनपेक्षितपणे झाल्या असून पोलीस अधीक्षक साळवे यांनी तत्काळ आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक शिवलाल भगत यांची पोलीस नियंत्रण कक्षात, तर वरोराचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची बल्लारपूर पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांची नागपूर ग्रामीण, तर ब्रम्हपुरीचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब खाडे यांची चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे, दुर्गापूरचे पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांची वरोरा पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सुध्दा करण्यात आल्याची माहिती आहे. या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तसा आदेश काढला आहे याविषयी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक सुधिर जाधव यांची राजुरा, प्रभूदास माहुलीकर पडोली, राजू मेंढे जिल्हा विशेष शाखा, किशोर सहारे दुर्गापूर, राजकुमार गुरले पोलीस नियंत्रण कक्ष, अशोक बोडे भद्रावती, महादेव सरोदे शेगाव, पुरुषोत्तम राठोड पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रकांत लांबट यांची सीसीटीएनएस पदी बदली करण्यात आली आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ पदभार स्विकारण्याच्या सूचनाही जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कडून देण्यात आल्या आहेत.

Previous articleखळबळजनक :- भद्रावतीमधे पटेल, वैद्य आणि शेखर रंगारी यांनी थाटला अवैध सुगंधीत तंबाखूचा व्यापार?
Next articleधक्कादायक :- विवाहित प्रियकराने शुल्लक वादातून प्रेयसीचा केला खून,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here