Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर मनपा आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांचे अधिकार महापौर राखी...

धक्कादायक :- चंद्रपूर मनपा आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांचे अधिकार महापौर राखी कंचर्लावार यांच्यासमोर चालेना ?

 

विजय जनार्धन कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस पण अतिक्रमण मनपाने का तोडले नाही ?

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग२५

चंद्रपूर मनपाच्या अधिकाऱ्यांनी आपले अस्तित्व आणि अस्मिता ही सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली असल्याने ते आपले परम कर्तव्यच विसरले असल्याने आता यांचे करायचे काय? हा प्रश्न शहरातील सर्वसामान्यांना पडायला लागला आहे, कारण एकीकडे ज्या नगरसेवकांना जनतेने निवडून दिले ते जनतेची सेवा करायला व जनतेचे प्रश्न सोडवायला, पण इथे तर नगरसेवक सैराट झाले असून त्यांनी इथे सत्ताधाऱ्यांचीच गुलामी पत्करली का ? असा प्रश्न निर्माण होत आहे, मात्र त्याहून कहर म्हणजे येथील अधिकारी आणि कर्मचारी हेच सत्ताधारी यांच्या सेवेत तल्लीन झाल्याने चंद्रपूर मनपामधे लोकशाही जिवंत तरी आहे का ? याबद्दल संशय यायला लागला आहे.

एरव्ही ज्यानी अतिक्रमण केले किंव्हा अवैध बांधकाम केले त्यांना मनपा प्रशासन कर्मचाऱ्यांकडून नोटीस देते अथवा त्यांच्या घरांवर दुकानावर नोटीस चिपकवला जाते पण यावेळी मनपा प्रशासनाने डाक पोस्ट द्वारे नोटीस पाठवला आणि दिनांक 20/10/2020 ला पाठवलेला नोटीस सात दिवसाच्या आत उत्तर दाखल करायची वेळ दिल्यानंतर सुद्धा मनपा प्रशासन जनार्धन मेडिकल च्या कंचर्लावार यांचे अतिक्रमण तोडत नाही, याचा अर्थ मनपा आयुक्त राजेश मोहिते आणि सहायक आयुक्त शीतल वाकडे यांचे अधिकार कंचर्लावार परिवारा समोर गौण आहे हे शीद्ध होते.

एकीकडे शहरातील सर्वसामान्यांचे शुल्लक अतिक्रमण चंद्रपूर मनपा तातडीने पाडते, जणू ते तत्काळ पाडणे कायद्यात असते पण दुसरीकडे महापौर राखी कंचर्लावार यांच्या नातेवाईकांचे अतिक्रमण हे बेकायदेशीर असल्यानंतर सुद्धा जणू कायदेशीर असल्याप्रमाणे ते पाडण्यासाठी चंद्रपूर मनपा प्रशासनातील अधिकारी धजत नाही, म्हणजे चंद्रपूर मनपा मधे नक्की चाललय तरी काय ? हेच कळायला मार्ग नसून सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले हे कोरोना पॉझिटिव्ह असताना व ते कोरोनटाइन सेंटर मधे उपचार घेत असताना त्यांना त्यांच्या व्हाट्सअप वर नोटीस पाठवून त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या घरांचे बांधकाम पडल्या जाते मग राखी कंचर्लावार यांच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या विजय कंचर्लावार यांनी जनार्धन मेडिकल च्या मागील मनपाच्या जागेवर अतिक्रमण केले त्याबद्दल चंद्रपूर मनपा आयुक्त यांना तक्रार दिल्यानंतर सुद्धा ते अतिक्रमण मनपा प्रशासन तोडत नाही म्हणजे चंद्रपूर मनपा प्रशासनच कंचर्लावार परिवारांच्या दावणीला बांधले गेले असल्याचे निदर्शनास येत आहे. खरं तर चंद्रपूर महानगरपालिका सत्ताधारी आणि येथील प्रशासन हे शहरातील जनतेला मूर्ख बनवित आहे, त्यामुळे जनतेचा आक्रोश येणाऱ्या काळात उग्र रूप धारण करून सत्ताधारी भाजपच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही असेच एकूण चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here