Home भद्रावती धक्कादायक :- भद्रावती पोलीस कर्मचारी शहाबाज सय्यदला हप्ता वसुलीचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी...

धक्कादायक :- भद्रावती पोलीस कर्मचारी शहाबाज सय्यदला हप्ता वसुलीचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी कंत्राट दिले का?

 

खाकी वर्दीतील डॉन असलेल्या शहाबाज सय्यदची उचलबांगडी जिल्हा पोलीस अधीक्षक करतील का?

भद्रावती प्रतिनिधी :-

शहाबाज सय्यद ह्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव भद्रावती शहरात सद्ध्या चर्चेचा विषय बनला असून काही अवैध दारू तस्कर यांच्यासोबत त्याची साठगांठ असल्याने उर्वरित अवैध धंदेवाईक यांना धमकावून त्यांच्याकडून जबरन हप्ता वसुली ते करीत असल्याची माहिती आहे, त्यामुळे भद्रावती पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अवैध धंदेवाईकांकडून हप्ता वसुलीचे कंत्राट दिले का ? असा सवाल निर्माण होत आहे.

काही महिन्यापूर्वी भद्रावती पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलीस कर्मचारी भीमराव पडोळे हे काही अवैध धंदेवाईक यांचे सरक्षणकर्ते व हप्ता वसुली मास्टर असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्याने त्यांची दखल तत्कालीन पोलीस अधीक्षक मौहेश्वर रेड्डी यांनी घेतली व तत्काळ त्यांची बदली केली होती, त्यामुळे भद्रावती शहरात त्यांच्या बदलीमुळे सर्वसामान्यांना आनंद झाला होता कारण ते सर्वसामान्यांना प्रत्त्येक कामाचे पैसे मागत होते, आता त्यांचीच री ओढत शहाबाज सय्यद हा पोलीस कर्मचारी जणू पोलीस डॉन असल्याप्रमाणे भद्रावती परिसरात वावरत असून त्यांची काही अवैध दारू विक्रेत्यांसोबत साठगांठ असल्याने भद्रावतीमधे दररोज लाखोची दारू चोरट्या मार्गाने येत आहे, तर दुसरीकडे अवैध सुगंधीत तंबाखू तस्कर रंगारी ज्यांचे दुकान मनोहर तकीज जवळ आहे व पटेल नावाच्या सुगंधीत तंबाखू तस्कर यांच्याकडून हप्ता वसुली करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन चे कार्यालयीन कामकाज न करता केवळ अवैध हप्ता वसुली करणाऱ्या शहाबाज सय्यद यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Previous articleधक्कादायक :- चंद्रपूर मनपा आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांचे अधिकार महापौर राखी कंचर्लावार यांच्यासमोर चालेना ?
Next articleखळबळजनक :- गडचांदूर नगर परिषद हद्दीत शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कोट्यावधीचा भूखंड घोटाळा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here