Home गडचांदूर खळबळजनक :- गडचांदूर नगर परिषद हद्दीत शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कोट्यावधीचा भूखंड...

खळबळजनक :- गडचांदूर नगर परिषद हद्दीत शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कोट्यावधीचा भूखंड घोटाळा,

 

मनसेचे तहसीलदार यांच्याकडे भूखंड घोटाळ्याची चौकशी बाबत निवेदन.

गडचांदूर प्रतिनिधी :-

गडचांदूर परिसरात विना अटी-शर्ती व कसलाच भूखंड कर न भरता १०० रू. च्या स्टॅम्प पेपर वर अवैध गुंठेवारी जमीन विक्री करणाऱ्या शेतमालक व भूमाफिया यांचे विरोधात तात्काळ कारवाई करावी व शासनाने राजस्व वसूल करून गडचांदुर चा सर्वांगीण विकासात हातभार लावावा अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव महालीण्ग कंठाळे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

गडचांदूर शहरात नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात भूमाफियांनी विळखा घातलेला असून,१) विनोद मडावी सर्वे क्रमांक१६ ,(२) महादेव सिडाम सर्वे क्रमांक२६६ ,(३) व्यंकय्या गुरम सर्वे क्रमांक१२८/१अ ,असे अनेक शेतमालक व भूमाफिया ,भरपूर प्रमाणात आदिवासी समाजाची शेती विकत घेऊन. गुंठेवारी पद्धतीने परस्पर १०० रू. स्टॅम्प पेपरवर आदीवासी शेत मालकाची सहीनिशी मोठ्या चलाखीने ,भूमाफिया शासनाची व जनतेची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून प्लॉट विक्री करीत आहे. याच कारणामुळे शासनाचा करोडो रुपयाचे राजस्व महसूल बुडाला .आणि यात शासकीय अधिकारी कोणतीही तात्काळ कारवाई न करता ,उलट भुमाफियांशी संगणमत करून सुस्त भूमिका घेत आहे. आणि याच कारणामुळे गडचांदूर शहरात नगर परिषदेकडे कसलेच ओपन प्लेस उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक शौचालय ,मुत्रीघर, बस स्टॉप , शुद्ध पाण्याचे आरो प्लांट, बगीच्या ,खेळाडूंसाठी व शुभ कार्यासाठी मैदाने विकासात्मक कार्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने ,आणि प्लॉट खरेदी धारकांना नगरपरिषद व शासनाकडून रस्ते, नाली, लाईट ,घरकुल, आवास योजना ,या सर्व सुख-सोयी पासून वंचित राहावे लागत असल्याने अर्थात या अवैध प्लॉट धारकांकडून नगरपरिषदेला कसलाच कर प्राप्त होत नाही .यामुळे येथील विकास कामे रखडलेला आहे त्यामूळे या ज्वलंत विषयावर शासकीय अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून याप्रकरणाची चौकशी करावी व संबंधित अधिकारी व शेती मालक आणि भू माफिया यांचेवर कारवाई करून शासनाचा बुडविलेला राजस्व महसूल वसूल करावा .अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here