Home चंद्रपूर धक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार...

धक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस ?

दत्तू कंचर्लावार यांचे जनार्धन मेडीकल मागील जागेचे अतिक्रमण असतांना म्रूतक विजय कंचर्लावार आले कुठून?

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग२६

चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर राखी कंचर्लावार यांच्या सेवेत तल्लीन झालेली मनपा प्रशासन व्यवस्था नेमके काय करताहेत हे त्यांना तरी कळत आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला आता पडलेला आहे. कारण जिवंत व्यक्तीला सोडून म्रूतक व्यक्तीच्या नावाने नोटीस पाठवून मनपा प्रशासनाने चक्क परलोकात आता नोटीस पाठविण्याची व्यवस्था केली की काय ? असा प्रश्न पडायला लागला आहे.

खरं तर सर्वसामान्यांचे शुल्लक अवैध बांधकाम तोडण्यात मनपा प्रशासन जणू आपत्कालात असल्यागत ते बांधकाम तोडतात मग चक्क महापौर राखी कंचर्लावार यांच्या घराचे बांधकाम मंजूर नकाशा नुसार नसतांना व त्यांचे पती संजय कंचर्लावार यांचे साई हेरीटेज व साई सुमन कॉंप्लेक्स हे सुद्धा अनधिकृत बांधकाम असताना ते तोडण्याची हिंमत महानगरपालिका प्रशासन करतांना दिसत नाही, एवढेच नव्हे तर त्यांचेच दीर राजेश कंचर्लावार आणि दत्तू कंचर्लावार यांचे सुद्धा अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण आहे, त्यामुळे कंचर्लावार परिवाराने कायदा जणू आपल्या बापाचा समजून व संपूर्ण महानगरपालिका प्रशासनाला आपल्या ताब्यात घेवून एकछत्री राज्य चालविले आहे का ? असा प्रश्न पडतो.

सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्या घराचे बांधकाम मनपा प्रशासनाने ते कोविड सेंटर मधे उपचार घेत असताना तोडले त्यामुळे आपल्यावर मनपा प्रशासनाने अन्याय केला त्याचे शल्य बोचत असल्याने त्यांनी मनपा प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरातील जटपुरा सराई मार्केट मधील मनपाच्या जागेवर दत्तू कंचर्लावार यांचे अतिक्रमण असल्याची तक्रार मनपा प्रशासनाला काही दिवसापूर्वी दिली होती, मात्र अनेक दिवस त्या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याने या संदर्भात मनपा प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली याबद्दल माहिती घेतली असता दत्तू कंचर्लावार यांनीच अतिक्रमण केले हे जगजाहीर असताना मनपा प्रशासनाला नेमका कुठला साक्षात्कार झाला कुणास ठाऊक पण त्यांनी दत्तू कंचर्लावार यांचे मोठे बंधू विजय कंचर्लावार जे सन २०१२ मधेच मरण पावले त्यांच्या नावाने अवैध बांधकाम संदर्भात नोटीस वाजवून एक प्रकारे स्वतःच्या अस्तित्वाची लक्तरे वेशीवर टांगली, कारण जो व्यक्ती शहरात मरण पावला त्याची नोंद मनपा प्रशासनाकडे असते मग मरण पावलेल्या विजय कंचर्लावार यांच्या नावाने नोटीस कुणाच्या सांगण्यावरून दिला ? काय महापौर राखी कंचर्लावार यांना याबद्दल माहिती नाही ? असे एक नव्हे अनेक प्रश्न शहरातील जनतेला पडलेली आहे.पण महत्वाची बाब म्हणजे ज्या आयुक्त सहाय्यक आयुक्त यांचा पगार हा जनतेच्या पैशातून होतो त्या जनतेच्या सेवेसाठी हे अधिकारी आहे की महापौर राखी कंचर्लावार यांची हुजरेगीरी करण्यासाठी यांना सरकार पगार देते हेच कळायला मार्ग नाही, विशेष म्हणजे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या प्रकरणात मौन पाळून आहे तरी कसे ? हे सुद्धा चंद्रपूर शहरातील जनतेला कोडे पडले आहे, एकूणच चंद्रपूर महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार भाजपच्या अंगलट येणार एवढे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here