Home भद्रावती खळबळजनक :- पोलीस गुंडा म्हणविणाऱ्या शहाबाज सय्यदचे भ्रष्ट कारणांमे उघड ?

खळबळजनक :- पोलीस गुंडा म्हणविणाऱ्या शहाबाज सय्यदचे भ्रष्ट कारणांमे उघड ?

 

आलिशान जिंदगी जगण्यासाठी दारू, जुगार, सट्टा व सुगंधीत तंबाखू धंदेवाईकांकडून हप्ता वसुली?

भद्रावती प्रतिनिधी :-

पोलीस म्हणजे जनतेच्या संरक्षणाचा प्रमुख आधार असतो पण पोलीसच जर गुंडा बनून अवैध धंद्यात असणाऱ्याकडून हप्ता वसुली करीत असेल तर सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवायचा तो कुणावर ? असा प्रश्न पडतो, पण हे चाललंय भद्रावती पोलीस स्टेशन मधे आणि तो स्वयंघोषित पोलीस गुंडा आहे पोलीस कर्मचारी शहाबाज सय्यद ,

भद्रावती पोलीस स्टेशन मधील शाहबाज सय्यद ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलिसांची आण, बाण आणि शान ही धुळीस मिसळून पोलिसांच्या खाकी वर्दीला कलंक लावण्याचा प्रयत्न चालविलेला असल्याचा खळबळजनक प्रकार समोर येत असून अवैध धंदेवाईक यांची दारू पकडल्या नंतर त्यापैकी काही दारू साठा परस्पर दुसऱ्या दारू तस्करांना विकायचा प्रकार त्यांची नित्याचीच बाब झाली असल्याची माहिती आहे. भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अवैध दारू विक्री, सट्टापट्टी, जुगार व सुगंधीत तंबाखू विक्री करणाऱ्या अवैध धंदेवाईक यांच्याकडून व्यक्तिगत हप्ता वसुली तो करीत असून जो पैसे देत नाही त्यांचा माल पकडायचा आणि त्याला जर्जर करायचे असला प्रकार सुद्धा त्याचा समोर येत आहे,

शहाबाज सय्यद यांचे क्वार्टर जणू एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांच्या क्वार्टरला लाजवेल असे असून घरात एसी ची थंडगार हवा आणि आलिशान चार चाकी गाडी असा थाट बघून कुणीही म्हणेल की एवढा पैसा यांचेकडे येतोय तरी कुठून ? पण त्यामागे यांचे कारनामे हेच खरे अर्थकारणाचे स्त्रोत असल्याने तो साधा पोलीस कर्मचारी असताना सुद्धा जणू पोलीस अधिकाऱ्यांची बरोबरी करतो,
शाहबाज सय्यद यांच्या या संपूर्ण कामकाजाची माहिती ठाणेदार पवार यांना नसावी असे शक्य नाही पण ते याकडे का दुर्लक्ष करताहेत हेच कळायला मार्ग नसून पोलीस खात्याला बदनाम होण्यापासून रोखण्यासाठी शहाबाज सय्यद यांची त्वरित उचलबांगडी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणी त्वरित चौकशी करून कारवाई करावी असा सूर जनतेतून समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here