Home गडचांदूर धक्कादायक :- पैनगंगा कोळसा खाणीतील दोन गटातील हल्ल्यात गडचांदूर पोलिसांनी का दाखल...

धक्कादायक :- पैनगंगा कोळसा खाणीतील दोन गटातील हल्ल्यात गडचांदूर पोलिसांनी का दाखल नाही केला गुन्हा ?

 

वंदना ट्रांसपोर्ट च्या वर्मा व साथीदारांनी केला होता सोमवारला मुन्ना शेख वर केला होता प्राणघातक हल्ला.

पोलीस पंचनामा भाग – १०

गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती यांच्या माध्यमातून हप्ताखोरी व अनेक प्रकरणातून पैसे खाण्याच्या भानगडीमुळे सर्वसामान्यांना न्याय मिळणे कठीण झाले असून इथे जो पैसा देईल त्याच्याच बाजूने निर्णय होईल व त्याला सन्मानाने सोडून देवून निरपराध लोकांना वेठीस धरण्याचे काम ठाणेदार गोपाल भारती करीत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असून पैनगंगा कोळसा खाणीत वंदना ट्रांसपोर्ट चे कुबेर बर्मा यांचे पुत्र व साथीदारांनी मुन्ना शेख यांच्यावर केलेला प्राणघातक हल्ला अजूनही पोलीस डायरी मधे नमूद झाला नसल्याने गडचांदूर पोलीस नेमकी करीत काय आहे ? हेच कळत नाही.

पैनगंगा कोळसा खाणीत नेहमीच वंदना ट्रांसपोर्ट चे कुबेर वर्मा व त्यांच्या साथीदारांची कोळसा भरण्याच्या कामात दडपशाही सुरू असून दुसऱ्या ट्रांसपोर्टर च्या गाड्यांना भरू न देता तानाशाही सुरू असते व मधात कुणी आले तर त्यांच्यावर हल्ला करून आपली दहशत ते कायम करीत असते अशातच सोमवारला सायंकाळी ५.३० वाजता कुबेर वर्मा यांच्या मुलांसह साथीदारांनी मुन्ना शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यात तो गंभीर जखमी झाला असता त्याला काही लोकांनी गडचांदूर पोलीस स्टेशन मधे तक्रार करण्यास नेले खरे पण पोलिसांनी तक्रार न घेता अगोदर त्याला दवाखान्यात भरती करा आम्ही तिथेच बयान घेण्यासाठी येईल असे म्हणून परत पाठवले त्यामुळे मुन्ना शेख याला चंद्रपूर च्या एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले पण दोन दिवस उलटून सुद्धा आरोपी कुबेर वर्माच्या साथीदारावर गुन्हे दाखल केले नसल्याची माहिती आहे तर दुसरीकडे ठाणेदार गोपाल भारती यांनी हे प्रकरण थंड बस्त्यात टाकण्यासाठी वंदना ट्रांसपोर्ट च्या वर्मा सोबत बोलणी केल्याची माहिती असून या प्रकरणात शकील अन्सारी हे प्रमुख भूमिकेत असल्याची चर्चा आहे. आता गडचांदूर पोलीस दोन दिवस लोटल्या नंतर सुद्धा पोलीस डायरीवर नोंद केली नसल्याने खरंच वर्मा व त्यांच्या साथीदारांवर विविध कलमाअन्वये गुन्हे दाखल करतील की आरोपीला सोडून देण्यात येईल हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleमनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार ?
Next articleकाय मनपा आयुक्त बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या छबू वैरागडे यांचे नगरसेवक पद रद्द करणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here