Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्या घरावर भाजप नगरसेविका छबु...

ब्रेकिंग न्यूज :- सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्या घरावर भाजप नगरसेविका छबु वैरागडे यांचा परिवारासह प्राणघातक हल्ला.

 

शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भाजपच्या ह्या नगरसेविका आहे की गुंड म्हणायची वेळ येते तेंव्हा ?

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग – २९

एकीकडे शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भाजप मधे अशा लोकांची भरती झाली ज्यांची अवैध बांधकामे व सरकारी आणि मनपा च्या मोक्याच्या जागेवर अतिक्रमण असून स्वतःचे घर बांधकाम सुद्धा काहींचे बेकायदेशीर आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर मनपा मधे सत्ता असल्याने यांची ही अवैध बांधकामे जणू वैध आणि कायदेशीर झाले की काय ? असा प्रश्न येथील सर्वसामान्यांना पडला असून दुसऱ्यांची बांधकामे मात्र यांच्या डोळ्यात सलत असतात, म्हणजे आपलं झाकायच आणि दुसऱ्यांच पाडायच अशी रणनीती भाजप सत्ताधारी यांनी बनविली असल्याने व महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना आपल्या कब्जात त्यांनी ठेवल्याने चंद्रपूर शहरातील जनतेत मोठा रोष निर्माण झाला आहे, अशातच मनपा महापौर राखी कंचर्ल्लावार यांच्यासह आता नगरसेविका छबू वैरागडे यांचे घरांचे बांधकाम सुद्धा अवैध असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे दिल्याने भाजप नगरसेविका छबू वैरागडे यांनी चक्क राजेश बेले यांच्या घरांवर आपल्या परिवारातील सदस्यासह प्राणघातक हल्ला आज सकाळी केला, त्यात राजेश बेलेसह त्यांचा भाऊ आणि आई पण जखमी झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
भाजप नगरसेविका छबू वैरागडे यांनी नगरसेविका असल्याचा फायदा घेत राजेश बेले यांच्या घराचे बांधकाम बेकायदेशीर असल्याबाबत महानगरपालिकेत तक्रार देवून राजेश बेले यांचे घर महानगरपालिकेकडून पाडले होते त्यामुळे राजेश बेले यांनी सुद्धा आपला वचपा काढण्यासाठी नगरसेविका छबू वैरागडे यांचे घराचे बांधकाम बेकायदेशीर आहे अशी तक्रार नुकतीच मनपा आयुक्तांकडे केली होती व फेसबुक, व्हाट्सअप या सामाजिक माध्यमांवर त्याबद्दल पोस्ट टाकली होती, शिवाय या संदर्भात भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलवर पण तक्रारीच्या अनुषंगाने बातमी प्रकाशित झाली होती, त्यामूळे भाजप नगरसेविका छबू वैरागडे यांची सर्वत्र बदनामी होत असल्याने व त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आल्याने त्यांनी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्या घरांवर आपल्या कुटुंबातील सदस्यासह प्राणघातक हल्ला करून राजेश बेले, त्याचे बंधू गिरीश बेले, आई पुष्पा बेले यांना गंभीर जखमी केले, दरम्यान स्वतः नगरसेविका छबू वैरागडे यांनी राजेश बेले यांची बाहेर उभ्या मोपेड गाडीला खाली पाडून त्यावर दगड टाकला असल्याचे विडिओ व्हायरल झाले आहे, त्यामुळे नगरसेविका छबू वैरागडे ह्या सेविका आहे की गुंड? याची शंका येते, कारण वार्डातिल नगरसेविका असे वर्तन करीत असेल आणि त्यातही भाजप सारख्या सुसंस्कृत म्हणवील्या जाणाऱ्या पक्षातील जर ती नगरसेविका असेल तर भाजप पक्षश्रेष्ठीनी याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. वाद हा विचारांचा असतो पण स्वतः लोकप्रतिनिधी जर ही कुणाच्या घरावर हल्ला करीत असेल तर अशा लोकप्रतिनिधींना वेळीच त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे. आता हे प्रकरण रामनगर पोलीस स्टेशन मधे पोहचले आहे पण बातमी लिहिस्तोवर कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे, त्यामुळे राजकीय दबाव येवून नगरसेविका छबू वैरागडे सह त्यांच्या साथीदारांना पोलीस वाचवीतात की त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना गजाआड करतात का हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here