Home गडचांदूर खळबळजनक :- गडचांदूर पोलीस स्टेशनमधे ठाणेदार गोपाल भारतीकडून पत्रकारांची दिशाभूल,

खळबळजनक :- गडचांदूर पोलीस स्टेशनमधे ठाणेदार गोपाल भारतीकडून पत्रकारांची दिशाभूल,

 

स्टेशन डायरी वर घटनेचा तपशील विचारल्यास ठाणेदाराकडे विचारा असे सांगितल्या जाते तर ठाणेदार स्टेशन डायरीकडे विचारा म्हणून सांगतात?

पोलीस पंचनामा भाग – ११

गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती यांनी पोलीस प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगून कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः बट्ट्याबोळ केला असल्याची चर्चा गडचांदूर परिसरात बघावयास मिळत आहे. अवैध धंद्याला उधाण आले असताना व पोलीस प्रशासनाची यामुळे बदनामी होत असताना सुद्धा ठाणेदार गोपाल भारती यांच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई का करीत नाही? हो मोठा प्रश्न असून आता तर चक्क पत्रकारांनी ठाणेदार भारती यांना एखाद्या घटने संदर्भात फोन केला तर तुम्ही स्टेशन डायरी कडून माहिती घ्या असे सांगितल्या जाते तर दुसरीकडे स्टेशन डायरी च्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना फोन केला तर तुम्ही ठाणेदार गोपाल भारती यांना फोन करा असे सांगितल्या जाते याचा अर्थ गडचांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटना ह्या मैनेज केल्या जात तर नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मागील सोमवारी पैनगंगा कोळसा खाणीत एका वंदना ट्रांसपोर्टच्या बाबा वर्मा नामक मालकांनी एका मुन्ना शेख नावाच्या सुपरवाईजर नावाच्या व्यक्तीस बेदम मारहाण केली त्यात तो गंभीर जखमी झाला होता मात्र त्याची तक्रार गडचांदूर पोलीस स्टेशनमधे अजूनपर्यंत नोंद केली नसल्याची चर्च असून या संदर्भात शकील अंसारी हे मध्यस्थी करून ह्या प्रकरणाला थंड बस्त्यात टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची पण चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणाचे नेमके झाले काय ? हा प्रश्न ठाणेदार गोपाल भारती यांना विचारल्या गेला होता पण त्यांनी स्टेशन डायरी कडे विचारा असे सांगितले तर स्टेशन डायरी च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की ठाणेदार साहेबांचा आदेश आहे की या बाबतीत कुणालाही माहिती द्यायची नाही त्यामूळे आता या संदर्भात माहिती विचारायची ती कुणाकडे ? हा प्रश्न पत्रकार प्रतिनिधींना पडला असून गडचांदूर पोलीस स्टेशनच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Previous articleब्रेकिंग न्यूज :- सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्या घरावर भाजप नगरसेविका छबु वैरागडे यांचा परिवारासह प्राणघातक हल्ला.
Next articleमहत्वाची बातमी:- महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसह ग्रामपंचायत निवडणुका फेब्रुवारीत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here