Home महाराष्ट्र मनसेचा उद्धव ठाकरे सरकारवरला अल्टिमेट ‘सोमवार’पर्यंत प्रश्न निकालात काढा नाहीतर ……

मनसेचा उद्धव ठाकरे सरकारवरला अल्टिमेट ‘सोमवार’पर्यंत प्रश्न निकालात काढा नाहीतर ……

 

वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सरकारला इशारा.

मुंबई, महाराष्ट्र :-

वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धव ठाकरे सरकारला पूर्णतः घेरले असून जेव्हा मागणी नसतानाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील ग्राहकांनी वीज बिल माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यांनी आता आपला शब्द फिरवला आहे त्यामुळे सोमवारपर्यंत वाढीव बिल माफ करा, अन्यथा मनसे राज्यभरात आंदोलन करेन, असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे या आंदोलचा उद्रेक झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहिल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबईत आज आयोजित पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. सरकारनं महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. फसवणूक केली आहे. सरकारनं दिलेला शब्द पाळायला हवा होता. वीजबिल भरू नका, असं आवाहन बाळा नांदगावकर यांनी राज्यातील जनतेला दिले आहेत.
बाळा नांदगावकर म्हणाले, ‘राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिटपर्यंत सवलत देऊ असं जाहीर केलं होतं. वाढीव वीज बिलाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मनसेच्या शिष्टमंडळाने सर्वात आधी ऊर्जामंत्र्यांची भेट घेतली होती. बेस्टच्या अधिकाऱ्यांनाही शिष्टमंडळ भेटलं. अदानी ग्रुप, रिलायन्स आणि बेस्टचे अधिकारी राज ठाकरेंना येऊन भेटले. राज्य सरकार म्हणून जबाबदारी होती की शब्द पाळायला होता. शेवटचा पर्याय म्हणून राज ठाकरे आणि मनसेचं शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटलं होतं.

राज्यपालांनी राज ठाकरे यांना शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला. यांनतर राज ठाकरे शरद पवारांशी बोलले. त्यानंतर पवारांनी राज ठाकरेंना निवेदन पाठवण्यास सांगितलं. त्यानुसार राज ठाकरेंनी विविध कंपन्यांच्या नावाची निवेदनं पाठवली. अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. आता कोणतीही सूट देऊ शकणार नाही, असं ऊर्जामंत्र्यानी जाहीर केलं. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची फसवणूक आहे, विश्वासघात आहे. श्रेयवादाच्या लढाईमुळे महाराष्ट्राच्या जनतेने का भोगायचं? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. सोमवारपर्यंत सरकारनं याबाबत निर्णय घेतला नाही तर मनसे जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढेलच, तसंच उग्र आंदोलनही करेल, असा अल्टिमेटम मनसेनं सरकारला दिला आहे. आंदोलनादरम्यान उद्रेक झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहिल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here