Home महाराष्ट्र खळबळजनक :- ‘मानवी हक्क दिनी’ उद्या 10 डिसेंबरला मंत्रालयासमोर आत्मदहन?

खळबळजनक :- ‘मानवी हक्क दिनी’ उद्या 10 डिसेंबरला मंत्रालयासमोर आत्मदहन?

 

आफ्रोहचे राज्यकार्यकारिणी सदस्य चंद्रभान सोनुने यांचा शासनाला इशारा.

बुलडाणा( प्रतिनिधी ):

महाराष्ट्र शासनाच्या 21 डिसेंबर 2019 च्या शासनाने घेतलेल्या निर्णयाला वर्ष होत आले तरीही या शासन निर्णयातील मुद्दा क्र.4.2 नुसार _बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बॅकेच्या 13 कर्मचा-यांनाअधिसंख्य पदाच्या नेमणूकीचे आदेश न दिल्याने व न्याय मिळत नसल्याने दि.10 डिसेंबर 2020 रोजी ‘मानवी हक्क दिनी’ मंत्रालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा आफ्रोह* या कर्मचारी संघटनेचे बुलडाणा जिल्हा सचिव व राज्य कार्यकारीणी सदस्य चंद्रभान सोनुने यांनी राज्य शासनाला दिला आहे.
याबाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना दि.23 /11/2020 रोजी पाठविण्यात आले असून मा.मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे, सहकार व पणन मंत्री श्री.बाळासाहेब पाटील, पालकमंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे,गृहराज्यमंत्री श्री.सतेज पाटील , प्रधान सचिव, सहकार व पणन यांच्यासह जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा उपनिबंधक व अध्यक्ष जिल्हा बॅक प्राधिकृत समिती बुलडाणा यांनाही या निवेदनाच्या प्रती सादर केल्या आहेत.
मा.सर्वोच्च न्यायालयाच्या 6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी 21 डिसेंबर 2019 चा शासन निर्णय काढण्यात आला. याच शासन निर्णयाची अंमलबजावणी करून मंत्रालयापासून तर जिल्हास्तरावरील सर्वच कार्यालयातील कर्मचा-यांना तात्पुरत्या स्वरूपातील अधिसंख्य
पदावर वर्ग करण्यात आले आहे.मात्र याच शासन निर्णयातील मुद्दा क्र.4.2 नुसार बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बॅकथेतील यापूर्वी सेवासमाप्त करण्यात आलेल्या 13 कर्मचा-यांना वर्ष होत आले तरीही बॅकेचे प्रशासन व सहकार विभागाचे अधिकारी अधिसंख्यपदावर नेमणूकीचे आदेश देण्याबाबत टाळाटाळ व कुचराई करीत आहेत.
या अन्यायाविरूद्ध चंद्रभान सोनुने यांनी यापूर्वी एकदा आत्मदहनाचा इशारा तसेच 5 दिवसाचे आमरण उपोषण केले होते.मात्र बुलडाणा बॅकेला श सहकार खात्याला जाग आली नाही. ‘मानवतेच्या दृष्टीकोनातून’ घेतलेल्या निर्णयानुसार या 13 कर्मचा-यांना न्याय मिळू शकला नाही.
शेवटी या अन्यायाच्या निषेधार्थ व या 13 कर्मचा-यांच्या मानवी हक्काचे हनन होत असल्यामुळे त्यांच्या वतीने
आफ्रोचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सचिव बुलडाणा जिल्हा चंद्रभान सोनुने यांनी ‘मानवी हक्क दिनी’च मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

Previous articleधक्कादायक :- झोडे च्या त्या रासलीला व्हाट्सअप स्टेट्स वरून होतेय शीद्ध?
Next articleधक्कादायक :- जागतिक मानवी हक्क दिनी’ शासनकर्ते व राज्यकर्ते आत्मदहनाची घटना घडण्याची वाट बघताहेत का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here