Home चंद्रपूर चिंताजनक :- 200 युनिट वीज माफ करण्याचे आश्वासन विसरणारे हे कसले दमदार...

चिंताजनक :- 200 युनिट वीज माफ करण्याचे आश्वासन विसरणारे हे कसले दमदार आमदार ?

 

लॉकडाऊनच्या काळात सरकारने 20 टक्के पून्हा वीज बिल दरवाढ केल्यानंतर सुद्धा किशोर जोरगेवार गप्प का?

लक्षवेधी :-

“काम झालं माझं अन काय करू तुझं” या प्रचलित ओळीला अगदी मनापासून सार्थक ठरविणारे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी ज्या 200 युनिट वीज बिल माफ करण्याच्या एका ज्वलंत मुद्द्यावर निवडणूक जिंकली तो मुद्दाच आता यांच्या कामकाजातून गायब झाला असून हे आमदार महाशय नको त्या मुद्द्यावर मात्र आपली अक्कल पाझरत असताना दिसत आहे. खरं तर लॉक डाऊन च्या काळात सरकारने जनतेला वीज बीलामधे सूट देवून त्यांच्या विस्कटलेल्या आर्थिक घडीला हातभार लावायला हवा होता मात्र उलट वीज ग्राहकांना जवळपास 20 टक्के वीज बीलामधे वाढ करून शॉक दिला आहे, अशा परिस्थितीत सरकारला धारेवर धरून किमान चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला वाढीव वीज बिल माफी संदर्भात किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न करायला हवे होते मात्र या महाशयांना दारूबंदी असताना जिल्ह्यात दारू येते कशी ? याचे जास्त टेन्शन आहे.

एकेकाळी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आशीर्वादाने राजकीय धडे घेतल्यानंतर आमदार बनण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला 200 युनिट वीज माफी मिळालीच पाहिजे आणि मी आमदार झाल्यावर ती मिळवून देणारच असे खुले आश्वासन देणारे किशोर जोरगेवार हे त्या आश्वासनाच्या भरोशावर आमदार झाले पण जेंव्हा खऱ्या अर्थाने चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला कोरोना च्या काळातील किमान वाढीव वीज बिल माफ करण्याची आवश्यकता असताना आमदार किशोर जोरगेवार मात्र त्या वीज बिला बाबत अवाक्षरही बोलायला तयार नाही मग हे 200 युनिट वीज बिल माफीसाठी काय प्रयत्न करणार ?

“जब दिल्ली मे 200 युनिट बिजली हर परिवार को मुफ्त दी जा सकती है तो हम चंद्रपूर जिल्हे के रहीवासीयो को मुफ्त बिजली क्यो नही दी जा सकती ?” हे किशोर जोरगेवार यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारला खुलं आव्हान होतं.आता प्रत्यक्षात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने त्यांना महाराष्ट्राच्या इतिहासात अपक्ष उमेदवार असताना 72 हजारा पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं त्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेचे किमान कोरोना काळातील वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार जर सत्ता पक्षातील गटात असताना सुद्धा प्रयत्न करीत नसतील तर ही चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेशी गद्दारी आहे आणि आमदार म्हणून पदावर राहण्याचा किशोर जोरगेवार यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही, पण चंद्रपूर जिल्ह्यातील जनता जणू खूळी असल्यागत गप्प आहे, ज्या जनतेने 200 युनिट वीज बिल माफ होईल या अपेक्षेने किशोर जोरगेवार यांना आपला लोकप्रतिनिधी निवडला.

किशोर जोरगेवार हे आता जणू मोदींच्या त्या 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी रोजगार देण्याच्या आश्वासनाची बरोबरी करतात की काय ? असाच प्रश्न उभा राहतो कारण मोदींचे ते आश्वासन एक निवडणुकीतील जूमला ठरला तसा किशोर जोरगेवार यांचा 200 युनिट वीज बिल माफीचे आश्वासन सुद्धा एक जूमला ठरतांना दिसत आहे. खरं तर किशोर जोरगेवार यांचे नुकत्याच साजरा झालेल्या वाढदिवशी बैनर आणि होर्डिंग बघितले तेंव्हा संतापच वाटला कारण त्या होर्डिंग वर दमदार आमदार म्हणूम किशोर जोरगेवार यांचा उल्लेख करण्यात आला होता, जो आमदार गावठी भाषेत आपल्या कार्यकर्त्याला अर्वाच्य शब्दात बोलतो, ज्यांनी आमदार झाल्यानंतर अशी कुठलीही भरीव कामगिरी केली नाही उलट जनतेला 200 युनिट वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले त्याबद्दल ते बोलायला तयार नाही मग हे कसले दमदार आमदार ?असा प्रश्न पडतो.

Previous articleसनसनिखेज:- आठवलेची आपल्या सवयीप्रमाणे पुन्हा एकदा औरंगाबाद नामांतर मुद्द्यावरून राजकीय लाचारी आली समोर?
Next articleब्रेकिंग न्यूज :- महाराष्ट्र सैनिकाला आई-बहिणी वरुन शिव्या देणाऱ्या पोलीस अधिकारी ‘राजेंद्र कांबळे’चे निलंबन करा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here