Home महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज :- महाराष्ट्र सैनिकाला आई-बहिणी वरुन शिव्या देणाऱ्या पोलीस अधिकारी ‘राजेंद्र...

ब्रेकिंग न्यूज :- महाराष्ट्र सैनिकाला आई-बहिणी वरुन शिव्या देणाऱ्या पोलीस अधिकारी ‘राजेंद्र कांबळे’चे निलंबन करा,

 

संपुर्ण राज्यातील संतप्त महाराष्ट्र सैनिकांची मागणी.पोलिस व  महाराष्ट्र सैनिक वाद पेटणार?

मुंबई महाराष्ट्र :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे नेहमी महाराष्ट्र राज्यातील पोलिसांची भूमिका याचे समर्थन करतात व त्यांना कुणीही शिव्या देवू नये त्यांच्यावर हात उचलू नये यासाठी महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करतात एवढंच काय मुस्लिम समाजाचा मोर्चा निघाला होता त्या मोर्चात महिला पोलीस कर्मचारी यांचे चारित्र्य हनन केले त्यांना मारहाण करून त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढले व छेडछाड केली म्हणून राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पोलिसांच्या रक्षणाची जबाबदारी घेत आझाद मैदानावर मोर्चा काढून मुस्लिम संघटनांचा समाचार घेतला होता, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पोलिसांचा सन्मान होत असेल तर पोलीसानी सुद्धा महाराष्ट्र सैनिकांची पाठराखण करायला हवी कारण महाराष्ट्र सैनिक हा स्वतःच्या भल्यासाठी लढत नसून तो जनतेच्या हितासाठी आणि शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात लढतो व जनतेला त्यांच्यापासून न्याय मिळतो पण राजेंद्र कांबळे यांनी महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो अशी घोषणा दिली म्हणून त्या महाराष्ट्र सैनिकाला मारहाण व शिवीगाळ केली त्या निर्लज्ज पोलीस अधिकाऱ्यांचा सर्वत्र निषेध होत आहे तर जी  शिवी दिली ती अख्ख्या महाराष्ट्राने बघितली आहे त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांचा अपमान हा खपवून घेतला जाणार नाही ही संतप्त प्रतिक्रिया सामाजिक माध्यमातून उमटत आहे त्यामुळे  त्या पोलीस अधिकारी राजेंद्र कांबळे यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी महाराष्ट्र सैनिकांकडून होताना दिसत आहे.

एकीकडे मनसे अध्यक्ष पोलिसांना सरक्षण मिळावं म्हणून मोर्चे काढतात आणि त्याच राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिक आंदोलन करतात त्यांना पोलीस अधिकारी आई बहिणी च्या नावाने शिवी घालून मारत असेल तर त्या पोलिसांचे करायचे काय ? हा गंभीर प्रश्न असून या घटने संदर्भात संतप्त प्रतिक्रिया येत असून पालघर चे महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांनी पोलिस अधिकारी राजेंद्र कांबळे यांना तुमच्या घरात आई बहिणी नाहीत का ? असा सवाल करून पोलिस स्टेशनला येतोय मी उत्तर पाहिजे शिव्या का दिल्यास ? असे आवाहन केले आहे त्यामुळे हा विषय आता पेटणार असून शेवटी राजेंद्र कांबळे या नालायक पोलीस अधिकारी यांना माफी मागावीच लागेल अशी चिन्हे दिसत आहे.

” पक्षपात करणाऱ्या वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्ताला जनतेच्या प्रश्नासाठी शासकीय भर सभेत सनदशीर मार्गाने जाब विचारणाऱ्या दोन वाघांचा म्हणजेच आपल्या महाराष्ट्र सैनिकांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे…आणि कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी भिडणारा जिल्हाध्यक्ष कसा असावा हे अविनाश जाधवच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा सर्वांनी बघितला, अनुभवला.. सत्ताधा-यांनी व त्यांच्या इशा-यावर काम करणाया लाचारांनी एवढेच लक्षात ठेवावे “समय बहुत बलवान होता है..” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र सैनिक सचिन मोरे यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here