Home मुंबई ब्रेकिंग न्यूज ;- मनसेचा नवा मेगाप्लॅन तयार, राजसाहेब ठाकरें अयोध्येला जाणार,

ब्रेकिंग न्यूज ;- मनसेचा नवा मेगाप्लॅन तयार, राजसाहेब ठाकरें अयोध्येला जाणार,

 

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांची  रणनीती ठरली,मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती.

मुंबई वृत्तसेवा :-

महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकार आपल्या जाहीरणाम्यात दिलेल्या आश्वासना वर काम करीत नसल्याने जनतेत असंतोष आहे तर दुसरीकडे भाजप हा पक्ष राष्ट्रीय स्तरांवर आपल्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे जनतेच्या नजरेतून अपराधी आहे त्यामुळे राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच एक सक्षम राजकीय पर्याय म्हणून समोर येतांना दिसत असून मनसेने जो मेगाप्लॅन तयार केला त्याचा एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्याला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर यांनी बैठकीत झालेल्या चर्चेचे इतिवृत्त प्रसारमाध्यमांसमोर ठेवले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा एक मेगा प्लॅन केला असून कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त म्हणजे मराठी भाषा दिनाला मराठी स्वाक्षरी मोहीम राबविणार आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वरिष्ठ मंडळी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाणार आहेत आणि त्याचा अहवाल राजसाहेब ठाकरे यांना देतील. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा मराठा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण, उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जाईल. त्या दिवशी मराठी स्वाक्षरी मोहिम सुरु करण्यात येईल. राजसाहेब ठाकरे मुंबई आणि ठाणेमध्ये सही करण्यासाठी जातील. मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू यांचा सन्मान मनसे करणार आहे. मराठी वृत्तपत्रे आणि मराठी वृत्तवाहिन्या, नाट्य कलावंत आणि सिनेकलावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here