भाजप सत्ताधाऱ्यांचे पाठीराखे म्हणून हजारे यांच्यावर नेटकऱ्यांची टीका.
भूमिपुत्र न्यूज नेटवर्क:-
दिल्लीत केंद्राच्या तीन क्रुषि कायद्या विरोधात शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यापासून आंदोलन सुरू असून काही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांची राळेगणशिंदी येथे भेट घेवून या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती, दरम्यान मी आपल्या सोबत आहे व लवकरच मी आंदोलनात सहभागी होईल अशी शाश्वती शिष्टमंडळाला त्यांनी दिली, पण प्रत्यक्षात ते देशात शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असताना सुद्धा सहभागी झाले नाही तर जुन्या स्वामिनाथन आयोगचा प्रस्ताव सरकारने स्वीकारावा एवढ्या फक्त मागण्या घेऊन अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीपासून उपोषणाचा सरकारला इशारा दिला होता. खरं तर ही अण्णा हजारे यांची दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनातून पळ काढण्याची भूमिका आहे हे स्पष्ट होते, कारण अण्णा हजारे यांनी जेव्हापासून केंद्रात भाजप सरकार आले तेव्हपासून त्यांनी सरकारच्या कामकाजाची समीक्षा किंव्हा चुकीच्या निर्णयाची निंदा केली नाही, केवळ मी आंदोलन करणार अशा वल्गना करून जनतेला भ्रमात टाकण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे यामुळे ते भाजप समर्थित आंदोलनकारी आहे असे जे आरोप त्यांच्यावर समाजिक माध्यमातून होत आहे ते आता खरे वाटू लागले आहे.काहींचे असे सुद्धा म्हणणे आहे की अण्णा हजारे हे जनतेला आंदोलनाच्या नावावर मूर्ख बनवीत आहे.
आता अण्णा हजारे 30 तारखेपासून उपोषणाला बसणार होते, त्याचपार्श्वभूमीवर फडणवीस यांनी अण्णा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत लगेच उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे ज्यामध्ये मोठी खेळी अण्णा हजारे यांनी खेळली.
काय म्हणाले अण्णा हजारे?
“अनेक वर्ष समाज, राष्ट्रहितासाठी आंदोलन करत आलो, हा घटनेने दिलेला अधिकार आहे, अन्याय आणि अत्याचार होत असेल तर शांततेत अहिंसेच्या मार्गाने लढा द्यायचा. स्वामिनाथन आयोगचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला आहे. जो खर्च आहे त्यापेक्षा पन्नास टक्के उत्पन्न वाढवून द्या, असं त्यात म्हटलं होतं. त्याबाबत सरकारने आश्वासन दिलं होतं. पण आश्वासनांची पूर्तता झाली नव्हती. आता सरकारने आश्वासनांची पूर्तता करण्याचं पुन्हा आश्वासन दिलं आहे. देवेंद्र फडणवीस त्यांचा निरोप घेऊन आले आहेत. आम्ही 15 मुद्दे दिले होते. ते मुद्दे मान्य झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. फडणवीस यांनी सांगितलेल्या निरोपावर विश्वास ठेवून मी माझा आंदोलनाचा निर्णय मागे घेत आहे”, असं अण्णा हजारे म्हणाले.
आता अण्णा हजारे यांना फडणवीस यांचे आश्वासन खरोखरच खरे वाटले असेल का? हा प्रश्नच आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देवू असे आश्वासन लोकसभा निवडणुकीच्या अगोदर केले त्याला आता जवळपास सात वर्ष होत आहे मग ते भाव जर नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिले नाही उलट शेतकऱ्यांना गुलाम बनविणारे तीन क्रुषि कायदे तयार करून एक प्रकारे त्यांना देशधडीला लावण्याचे मोदी सरकारचे उपद्व्याप सुरू असल्याने हजारो शेतकरी कुडकुडत्या थंडीत दोन महिन्या पेक्षा जास्त काळा पासून दिल्लीत आंदोलन करीत आहे त्यांच्याकडे लक्ष देण्यास मोदी सरकारकडे वेळ नाही तर मग अण्णा हजारे यांचे कसे काय आश्वासन मोदी सरकार पूर्ण करणार आहे?हा मोठा गंभीर प्रश्न असून समाजसेवक अण्णा हजारे हे भारतातील जनतेला विशेषतः शेतकऱ्यांना मूर्ख बनवीत असल्याची बाब उघड होतांना दिसत आहे.