Home चंद्रपूर लक्षवेधी :-आमदार किशोर जोरगेवार यांना बेरोजगारांचा एवढा पुळका मग वीज ग्राहकांचा का...

लक्षवेधी :-आमदार किशोर जोरगेवार यांना बेरोजगारांचा एवढा पुळका मग वीज ग्राहकांचा का नाही?

 

200 युनिट वीज माफीचा विसर पडलेल्या जोरगेवारांचा नाना शामकुळें होणार?

लक्षवेधी :-

“आंधळ दळत आणि बहीर पीठ खात” अशी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात गत झालेल्या जनतेची खरी फजिती कोणी केली असेल तर ती आमदार किशोर जोरगेवार यांनीच,यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी येथील मतदारांना चक्क मूर्ख बनवल. नव्हे मतदारांना त्यांनी मूर्खात काढल.पण आता जेंव्हा कोरोना काळात गोरगरिबांची व मध्यमवर्गियांची अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती झाली असतांना ते वीज बिल भरू शकले नाही व आता त्यांचे वीज कनेक्शन तोडायला महावितरण कंपनीचे लोक येत आहे व काहींचे वीज कनेक्शन तोडले पण आहे अशा परिस्थितीत ज्या वीज ग्राहकांच्या भरोशावर ते आमदार झाले त्या वीज ग्राहकांना साधा दिलासा पण आमदार किशोर जोरगेवार देत नसेल तर ह्या आमदारांचे आता करायचे काय? असा प्रश्न मतदारांना पडलेला आहे.

“खरं तर बालिश बहु बायकांत बडबडला” असे वाक्य आमदार किशोर जोरगेवार यांना लागू पडत आहे, कारण बायकांच्या घोळक्यात काहीही बोललं तरी फरक पडत नाही तशी गत जोरगेवार यांची झाली आहे, कारण जर तूम्हच्यात धमक नव्हती तर जनतेला 200 युनिट वीज बिल माफीच्या आश्वासनांचा बालिशपणा का केला? आणि आता तर हद केली व हळदीकुंकू कार्यक्रमात ते म्हणाले की या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वाणांची देवाण घेवाण करतात मात्र महिलांच्या वैचारीक सक्षमीकरणासह समाज परिवर्तणासाठी या निमीत्याने का होईना वाणांसह विचारांचीही देवाण घेवाण गरजेची आहे. म्हणजे “दुसऱ्यासांगे ब्रम्हद्न्यान आणि स्वतः कोरडे पाषाण” अशीच परिस्थिती किशोर जोरगेवार यांची झाली आहे. तुम्ही विचारांची देवाणघेवाण करून समाज परिवर्तन करा आणि मी तुम्हाला 200 युनिट वीज बिल माफीचे आश्वासन देवून मूर्ख बनवीतो अशीच काहीशी  रणनीती त्यांची दिसत आहे.

दुसऱ्यांना तत्वद्न्यान सांगणे सोपे आहे मात्र त्याचे अनुकरण करणे किती कठीण आहे हे किशोर जोरगेवार यांच्या करणी व कथनी वरून शीद्ध होते. आता जेंव्हा गोरगरिबांना पाच पाच दहा दहा हजार रुपयाचे वीज बिल भरायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे व मध्यमवर्गिय वीज ग्राहकांना दहा ते पंचवीस हजार वीज बिल भरणार कसे याची चिंता असतांना आमदार किशोर जोरगेवार यांना आता स्थानिक बेरोजगार यांच्या रोजगाराचा प्रश्न कसा महत्वाचा वाटतोय? आणि आताच का वाटतोय? मग असे असेल तर वीज ग्राहकांचा प्रश्न महत्वाचा नाही का? आमदार किशोर जोरगेवार यांना खरं तर आपण आमदार आहो की नाही? याचंच जणू भान उरल नाही, कारण त्यांना आमदाराची गरीमा अजूनही कळली नाही ती त्यांच्या एका व्हायरल विडिओतून दिसली आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला एवढ चिल्लर करून ठेवलय की आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार कोण? असा प्रश्न पडतो.पण आता जर ते स्थानिक बेरोजगार तरुणांना वेकोली कंत्राटी कंपनीत रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करत असेल तर वीज ग्राहकांना किमान वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी तर त्यांनी पुढे यायला हवे नाहीतर मग यांचा नाना शामकुळें करायला वेळ लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here