Home Breaking News क्राईम :- अनैतिक संबंधातून आलेल्या संशयाने मित्रांनीच केला मित्राचा खून.

क्राईम :- अनैतिक संबंधातून आलेल्या संशयाने मित्रांनीच केला मित्राचा खून.

 

हात,पाय,डोके शरीरापासून अलग करून केला क्रूरपणे खून. मित्र कधी शत्रू बनेल याचा नेम नसल्याचा मोठा पुरावा.

सोलापूर न्यूज नेटवर्क:-

एकावेळेस शत्रू परवडला कारण त्याच्यापासून आपण सावध असतो पण जर मित्रच शत्रू निघाला तर आपण मित्राच्या कटात अलगद फसतो त्याचे उदाहरण सोलापूर जिल्ह्यात घडले असून ते दोन मित्र आपसात चांगले जिवलग होते. त्यांचे एकमेकांच्या घरी येनेजाणे होते. पण संजय याचे अनैतिक संबंध असल्याचा ईतर मित्रांना संशय होता. म्हणून त्याला ओल्या पार्टी च्या बहाण्याने नेले आणि परतत असतांना वाटेतच त्याचा खून केला. ह्या घटनेचा तपास पोलिसांनी जलदगतीने करून चार आरोपी पैकी दोन आरोपीना काही तासातच गजाआड केले.

इंदापूर तालुक्यातील गारअकोले गणेशगाव या पुलाजवळ २० जानेवारी रोजी हात, पाय , डोके नसलेले धड आढळून आले होते.पोलिसांना माहीती मिळाल्यावर मृतदेह ताब्यात घेतला. आणि तपस कार्याला सुरवात केली. माढा तालुक्यातील टाकली (टे) येथील संजय महादेव गोरवे हा पहिल्या दिवशी घरून गेला तेव्हा पासून बेपत्ता होता. त्याच्या आईला शंका आल्याने तिने पोलिसात तक्रार नोंदवली. इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच विक्की उर्फ व्यंकटेश विजय भोसले आणि महेश रा. टाकळी (टे) ता माढा, जि. सोलापूर प्रभाकर सोनवणे याला पळून जाण्याचा तयारीत असतांना अटक केली.
या भयंकर घटनेबद्दल आरोपींनी पोलिसना सांगितले की मय्यात संजय आणि मारेकरी एकाच गावातील रहिवासी होते.त्यांच्यात मित्रत्व असल्याने एकमेकांच्या घरी येनेजाने होते. संजय चे अनैतिक संबंध असल्याचा त्यांना संशय होता. त्यांनी आपल्या आणखी दोन मित्रांना कटात सहभागी करून घेतले. त्यांनी आपल्या एका मित्राकडे ओलीपार्टी केली. ठरल्याप्रमाणे परत येताना भीमा नदी पात्रा जवळ गाडी थांबवून संजय ला नदीपात्रात नेऊन सपासप वार केले आणि त्याचे हात, पाय आणि मुंडके संगम येथे तर धड त्याच ठिकाणी पाण्यात टाकले. त्याची दुचाकी बाबड्याजवल सोडली. मारेकऱ्यांनी ईतकी काळजी घेतक्यानंतर देखील पोलिसांनी मारेकऱ्यांपैकी दोघांना अटक केली आहे तर दोघे फरार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here