Home महाराष्ट्र दुर्दैवी:- पूजा चव्हाण व डॉ.शितल आमटे यांच्या आत्महत्या मागचे खरे कारण काय?

दुर्दैवी:- पूजा चव्हाण व डॉ.शितल आमटे यांच्या आत्महत्या मागचे खरे कारण काय?

 

अपेक्षाभंग की अन्यायाची परिषिमा?

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

जीवनात प्रत्तेकाना काही ना काही ध्येय व स्वप्ने असतात व त्या स्वप्नांना व ध्येयाना ती जपत असतात,परंतु त्यांना जेंव्हा तडा जातो तेंव्हा त्यांच्या जीवनात काहीच उरत नाही अशा परिस्थितीत मग आत्महत्येचा विचार मनात येतो आणि मग होत्याच नव्हत होत.अशाच महाराष्ट्रातील दोन घटना आत्ताच घडल्या ज्यामुळे समाजमन हळहळल आहे.

डॉ. शितल आमटे ह्या ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री बाबा आमटे यांच्या नात ज्या स्वतः एक डॉक्टर होत्या व त्या लोकांना मानसिक त्रासातून कसे बाहेर पडायचे याबद्दल मार्गदर्शन करायच्या,आनंदवन येथे त्या महरोगी सेवा समितीच्या कार्यकारी अधिकारी होत्या, त्यांचे अनेक कलाकारांशी पत्रकार व राजकीय पुढारी यांच्याशी जवळचे सबंध होते,ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी अगदी आत्महत्येच्या दहा मिनिटापर्यंत त्या महाराष्ट्र मैक्श च्या रवींद्र आंबेकर यांच्याशी मोबाईल वर आपल्या भावना व्यक्त करीत होत्या पण काही वेळातच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आणि आपली जीवनयात्रा संपवली,खरं तर रवींद्र आंबेकर यांच्याशी त्यांनी ज्या गोष्टी शेअर केल्या त्याचा जरी पोलिसांनी तपास केला तरी डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणाची उकल होऊ शकते पण मागील अनेक महिन्याचा काळ लोटला तरी अजूनपर्यंत त्यांच्या आत्महत्येस कोण जबाबदार याचे कारण समोर आले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. पण त्यांच्या आकस्मिक आत्महत्या प्रकरणामुळे सामाजिक क्षेत्रात मोठी हानी झाली ही बाब कुणी नाकारू शकत नाही कारण त्यांच जे ध्येय होत की आपण आपल्या आयुष्यात जगावेगळ काम करून नावलौकिक मिळवायचा पण त्यात त्यांना अपयश आलं की त्यांच्या त्या स्वप्नाला कुणी भंग केल हे कळलच नाही.

आता दुसरीकडे नुकत्याच पुण्यातील वानवडी परिसरातील हेवन पार्क इमारतीत राहणाऱ्या २३ वर्षीय पुजा चव्हाण या तरूणीने ८ फेब्रूवारीच्या पहाटे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. विशेष म्हणजे पुजा चव्हाण या २३ वर्षीय तरूणीला टिकटॉक स्टार म्हणून ओळखले जायचे. तिचा चाहतावर्ग ही मोठा होता. अनेक जणांना तिच्या सारखं व्हावसं वाटायचं. बीड जिल्ह्यातील परळी शहरात वसंतनगर परिसरात आईवडिल आणि बहीणीसोबत ती राहायची. इंग्रजी शिकण्यासाठी तिने पुण्याची वाट धरली. अगदी कमी वयातच सामाजिक कार्यात ती सक्रीय झाली होती. बोलण्यातलं धाडस, जिद्द, उच्च राहणीमान यामुळे संपुर्ण राज्यात तिला टिकटॉकच्या माध्यमातून ओळखले जायचे. इतकेच नव्हे तर सोशल मिडियावर पुजा चव्हाण नेहमी सक्रीय असायची. तिच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असायचा. तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट प्रेरणादायी असायच्या. नववर्षाच्या सुरूवातीला तिने मनात खुप काही इच्छा असल्याची पोस्ट शेअर केली होती त्यात तिने भरलेली खाती, समृध्द नाती आणि सुखी आयुष्य…सगळं २०२१ मध्ये हवंय…चला सूरूवात करूया. मात्र त्यानंतर १ महिन्यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदीरासमोरील फोटो तिने शेअर केला होता त्यात तिच्या चेहऱ्यावर तणाव दिसून येत होता. सर्वांना जगण्याची प्रेरणा देणाऱ्या पुजाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने तिला हा निर्णय का घ्यावा लागला? तिच्या आत्महत्येचं खरं कारण समोर येणं गरजेचं आहे.दरम्यान तिच्या आत्महत्येमागे शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड असल्याचं विरोधी पक्षांकडून बोललं जात आहे. यामध्ये या मंत्र्याच्या ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात काय निष्पन्न होतंय ते येणाऱ्या पोलीस तपासात समोर येईलच.

डॉ. शितल आमटे आणि पूजा चव्हाण ह्या दोन्ही कला क्षेत्राशी निगडीत होत्या त्या भावनाशील होत्या म्हणजेच हळव्या होत्या त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट जर आपल्या मनाविरुद्ध जात असेल तर त्यांच्या जीवनात आता काहीच उरल नाही असा ग्रह निर्माण व्हायचा त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला की त्यांच्यावर अन्यायाची परिशिमा झाली हे सांगता येत नाही आणि म्हणूनच यांच्या दोघींच्या आत्महत्येत सारखेपणा दिसतो आहे, आता डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येचे कारण गूलदस्त्यात आहे खरे पण पूजा चव्हाणांच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडियो व्हायरल झाल्या त्याची सखोल चौकशी झाली तर संजय राठोड यांची पोल खुलु शकते पण मग डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येचे नेमकं काय कारण?याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here