Home चंद्रपूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागात चाललाय भोंगळ कारभार?

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागात चाललाय भोंगळ कारभार?

 

मनसे जनहित विभाग जिल्हाध्यक्ष राजू बघेल यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.

चंद्रपूर :- मागील कित्येक वर्षापासुन खेडयापाडयात पाणी पुरवठयाचे काम या विभागामार्फत सुरू आहेत. परंतु सुरू असलेल्या कामांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे बहुतांश गावातील कामे निकृष्ठ दर्जाचे झाल्याने पाणी पुरवठा बंद पडलेला आहे. या योजनांवर शासनाने करोडो रूपयाचा निधी खर्च केलेला आहे. परंतु त्याचा फायदा ना जनतेला होत आहे नाही सरकारला होत आहे. अधिकारी व कंत्राटदार यांनीच संगनमत करून लाखो रूपये हडप करण्याचा सपाटा सुरू केला आहे. याबाबत खेडयापाडयातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे अनेक तकारी प्राप्त होत आहेत त्यापैकी सिन्देवाही उपविभाग अंतर्गत मौजा जानाळा तह. मुल जि. चंद्रपूर व राजुरा उपविभाग अंतर्गत मौजा सुकडपल्ली,तह. राजुरा, जि. चंद्रपूर येथील पाणी पुरवठा योजनेला मनसेच्या चमुने भेट दिली असता अत्यंत भयानक प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधीत कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्याशी चर्चा करण्यासाठी संपर्क केला परंतु त्यांनी मुजोरपणा करून या प्रकरणाकडे जाणुनबुजुन डोळेझाक केलेली आहे. या गंभीर प्रकरणी एका साप्ताहिक वर्तमानपत्रात बातमी सुद्धा प्रकाशित करण्यात आली पण एक महिण्याचा कालावधी लोटूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणी तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. या प्रसंगी मनसेचे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष राजू बघेल,जिल्हा सचिव गुरुदेव मोगरे, वाहतूक सेना शहर संघटक असलम खान व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here