Home भद्रावती ब्रेकिंग न्यूज :-भद्रावती एनटीपिसी रेल्वे क्रासिंग जवळ क्लोरोवेट गाडीची नैनो गाडीला जोरदार...

ब्रेकिंग न्यूज :-भद्रावती एनटीपिसी रेल्वे क्रासिंग जवळ क्लोरोवेट गाडीची नैनो गाडीला जोरदार धडक

 

दोन गंभीर जखमी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

उमेश कांबळे भद्रावती :

नागपूर चंद्रपुर मुख्य मार्गावरील एनटीपीसी रेल्वे क्रॉसिंग जवळ समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने डिव्हायडर ओलांडून समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाला धडक दिल्याने नैनो कंपनीच्या वाहनातील चंद्रकांत रामकृष्ण पोईनकर वय ४८ व त्यांच्या पत्नी कुमुद् चंद्रकांत पोईनकर वय ४४ राहणार गुरु नगर, ठेंगे प्लॉट भद्रावती हे
दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी २.४५ वाजता घडली.

चंद्रकांत रामकृष्ण पोईनकर व त्यांच्या पत्नी कुमुद् चंद्रकांत पोईनकर हे दोघेही एम एच ३४ एए ९७८५ नैनो कार ने चंद्रपूरकडे जात असताना एम एच ४७ सी ७८४२ क्लोरोवेट ही गाड़ी भरधाव वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले व डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या नैनौ कारला जोरदार धडक दिली त्यात वाहनातील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात घडविणारा वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून भद्रावती पोलिसांनी त्यांचावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहे.

Previous articleजिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागात चाललाय भोंगळ कारभार?
Next articleदुःखद :- अत्यंत शोकाकूल वातावरणात इंजिनियर विद्यार्थी शुभम फुटाणे यांच्यावर अंत्यसंस्कार,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here