Home चंद्रपूर दुःखद :- अत्यंत शोकाकूल वातावरणात इंजिनियर विद्यार्थी शुभम फुटाणे यांच्यावर अंत्यसंस्कार,

दुःखद :- अत्यंत शोकाकूल वातावरणात इंजिनियर विद्यार्थी शुभम फुटाणे यांच्यावर अंत्यसंस्कार,

 

घूग्गूसकरांनी कैन्डल मार्च काढून आरोपी गणेश पिंपळशेंडेला फाशीची शिक्षा करण्याची केली मागणी.

घूग्गूस प्रतिनिधी :-

सद्ध्या चंद्रपूर जिल्ह्यात गुंडांराज असून खून अपहरण व बलात्कार सारखे गंभीर गुन्हे घडत आहे, अश्याच घुग्घूस वेकोलि रामनगर वसाहत निवासी इंजिनियरींगचा विद्यार्थी शुभम दिलीप फुटाणे यांचे अपहरण करून त्याची हत्या करून त्याचे प्रेत जाळण्याचा गंभीर प्रकार आरोपी गणेश पिंपळशेंडे यांनी केल्याने या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशी द्यावी याकरिता आज रविवारी 14 फेब्रुवारी 2021 ला सायंकाळी सहाच्या सुमारास आक्रोश कँडल मार्च काढण्यात आला. मार्च मध्ये घुग्घूसवासीय सहभागी झाले. आरोपीला फाशीस शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करीत शुभम फुटाणे याचे घरापासून कैन्डल मार्च निघाला व गांधी चौकात या कैन्डल मार्चचा समारोप करण्यात आला.

खंडणीसाठी शुभम फुटाणे याला जिवंत जाळून हत्या करणारा मारेकरी गणेश पिंपळशेंडे यास जिल्हा सत्र न्यायालयाने रविवारी 18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी गणेशने हत्येची कबुली दिली. पण, हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट केले नाही. रविवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात शुभमवर अंत्यसंस्कार पार पडले.

17 जानेवारी रोजी मृतक शुभम मित्रांसोबत पार्टी करायला जातो, असे सांगून निघाला होता. पण घरी परतला नाही. दुसर्‍या दिवशी त्याच्या भ्रमणध्वनीवरून कुटुंबियांना 30 लाखांची खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यास त्याची हत्या करण्यात येईल, असे सांगण्यात आले. पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली गेली. चारही दिशेने पोलिसांनी तपास केला. पण, कुठेही मृतकाचा सुगावा लागला नव्हता.दरम्यन, रविवारी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, शहर अध्यक्ष विवेक बोंढे यांनी शुभमच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून सात्वंना केली. या घटनेचा तपास घुग्घुस पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here