Home धक्कादायक धक्कादायक :- सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून केली...

धक्कादायक :- सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या.

 

कर्तव्यावर असतांना केबिन मधे स्वत:ला झाडली गोळी.

मुंबई न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनात आत्महत्त्या करण्याचे सत्र कायम असून एपीएमसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी म्हणजेच आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस ठाण्यात आल्यानंतर ते स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन बसले. त्यानंतर काही वेळाने गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता हा प्रकार उघड झाला .दरम्यान पवार हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. यामुळे ते सतत शांत रहायचे. यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे तणावाच्या करणाबाबत चौकशी देखील केली होती. परंतु त्यांनी स्वतःच्या तणावाबाबत कोणाकडेही वाच्यता केली नव्हती. मात्र ते आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक कारणाने त्रस्त होते असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Previous articleदुःखद :- अत्यंत शोकाकूल वातावरणात इंजिनियर विद्यार्थी शुभम फुटाणे यांच्यावर अंत्यसंस्कार,
Next articleखळबळजनक :- पुजा चव्हाणचे वडील बंजारा समाजातील पुढाऱ्याच्या दबावात?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here