Home क्राईम स्टोरी खळबळजनक :- पुजा चव्हाणचे वडील बंजारा समाजातील पुढाऱ्याच्या दबावात?

खळबळजनक :- पुजा चव्हाणचे वडील बंजारा समाजातील पुढाऱ्याच्या दबावात?

 

वाशीममधे बंजारा समाजाच्या महंताची बैठक संजय राठोड यांना वाचविण्यासाठी प्रयत्न.

न्यूज नेटवर्क :-

स्वतःच्या मुलीने आत्महत्या केली तर त्या बापाची काय अवस्था होत असेल ते त्या बापालाच माहीत पण आता त्या प्रकरणात प्रसारमाध्यमा मधे जी चर्चा होते त्यामुळे पुन्हा त्या बापाचे काळीज वेदनेने व्याकुळ होते अगदी अशीच परिस्थिती झालेल्या पुजा चव्हाणच्या वडिलांची झाली असून तिच्या आत्महत्त्या प्रकरणाची चर्चा महाराष्ट्रात गाजत असल्याने पूजाचे वडील प्रसारमाध्यमांनी आम्ह्च्या कुटुंबाची बदनामी करू नये अशी विनंती केली आहे.या संदर्भात पुजाने बॅंकेकडून कर्ज घेतले होते त्यामुळे ती तणावात होती, त्यातून तिने आत्महत्या केली असावी असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. परंतु बँकेकडून एकही नोटीस पुजाच्या कुटुंबीयांना आली नाही. किंव्हा पैशासाठी बैँकेने त्यांच्या कुटुंबाकडे कधीही तगादा लावला नाही असे असतांना पूजा चव्हाणच्या वडिलांनी रविवारी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, आमच्याकडे बँकेचे कर्ज आहे. बँकेच्या कर्जामुळे पुजा तणावाखाली होती. प्रत्येक महिन्याला 55 हजार बॅंकेत जमा करावे लागतात, हे पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न पुजाला पडला होता. मात्र प्रत्यक्षात तिच्या कुटुंबीयांना केवळ बॅंकत 35 हजारच जमा करावे लागत होते.मग पूजाचे वडील खोटं का सांगत आहे? अर्थात त्यांच्यावर कुणीतरी दबावतंत्राचा वापर करीत आहे का? अशी शंका यायला वाव आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात पुजा व तिचे कुटुंबीय कुक्कुट पालनाचा व्यावसाय करतात, 2018 मध्ये पुजा चव्हाण हिने एसबीआय बँकेकडून तेरा लाख पन्नास हजारांचे कर्ज घेतले होते. या पैशातूनच कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र नऊ महिन्यांपूर्वी अचानक कोरोनाचे संकट आले. कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला, लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार बंद असल्यामुळे बँकेचे हप्ते भरले गेले नाहीत, मात्र असे असताना देखील बँकेकडून कसलीच नोटीस तीच्या कुटुंबीयांना पाठवण्यात आली नसल्याची बातमी आहे.त्यामुळे पूजा च्या आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना वाचविण्यासाठी बंजारा समाजाच्या संघटना व महंत हे युद्धस्तरांवर प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे जर संजय राठोड दोषी नाही तर ते प्रसारमाध्यमांसमोर का येत नाही? आणि त्यांनी आपला मोबाईल फोन बंद का ठेवला? असे प्रश्न आता समाजमाध्यमांवर विचारल्या जात आहे,अर्थात पूजाच्या वडिलांना गप्प ठेवण्यासाठी बंजारा समाज संघटना व महंतांना समोर केल्या जात आहे का? हे चौकशीत निष्पन्न होईल पण तशी चौकशी पोलीस करतील का? हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here