Home महाराष्ट्र खळबळजनक :- त्या सौ.पूजा अरुण राठोड नावाच्या महिलेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचा...

खळबळजनक :- त्या सौ.पूजा अरुण राठोड नावाच्या महिलेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचा फोन बंद का ?

 

 

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्भपात नोंद असल्याने खळबळ.

औरंगाबाद न्यूज नेटवर्क :-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण हे महाराष्ट्रातील तमाम शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक वेदनादायी ठरले आहे. कारण शिक्षण घेवून जेमतेम आपल्या करियर च्या उंबरठ्यावर असतांना आत्महत्त्या करण्याची वेळ स्वतःची प्रतिभा निर्माण करणाऱ्या मुलीवर यावी म्हणजे तीचेवर मोठा अतिप्रसंग झाला असावा किंव्हा तिच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या असाव्या असेच एकूण चित्र दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “सौ.पूजा अरूण राठोड” नावाच्या महिलेची गर्भपात झाल्याची नोंद आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रकाशित केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गर्भपात करणाऱ्या महिलेचे नाव सौ. पूजा अरुण राठोड आणि वय २२ वर्ष दाखवण्यात आले असल्याने संशय वाढला आहे. पूजा चव्हाणने बनावट नाव सौ.पूजा राठोड धारण करून गर्भपात केला का? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील 4 फेब्रुवारी रोजीचे सौ. पूजा अरुण राठोड या नावाची प्रिस्क्रिप्शन व्हायरल होत आहे. पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाहीये. मात्र, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी फोन बंद करून ठेवल्यामुळे संशय अधिक बळावला आहे. गर्भपात करणारी महिला आणि पूजाचे वय २२ असे समान आहे. शिवाय पूजा चव्हाण प्रकरणात अरुण राठोड एक महत्त्वाचा दुवा आहे. पूजा राठोडच्या गर्भपाताच्या घटनेनंतर आठ दिवसनीच पूजा चव्हाणने आत्महत्या केली. या दोन्ही घटना परस्पर संबंधित आहेत का? याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे.

विशेष म्हणजे मंत्री संजय राठोड आणि अरूण राठोड यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये पूजा गर्भवती राहिल्याचे संभाषण आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही नवी माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. प्रिस्क्रिप्शननूसार, सौ.पूजा अरूण राठोड ही ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक ३ होता आणि डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसत असल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here