Home चंद्रपूर धक्कादायक :- शुभम फुटाणे हत्त्या प्रकरणातील पोलीस तपासात होणार मोठा खुलासा?

धक्कादायक :- शुभम फुटाणे हत्त्या प्रकरणातील पोलीस तपासात होणार मोठा खुलासा?

 

वेकोलीच्या एका अधिकाऱ्यांनी सुपारी दिली असल्याची चर्चा? तो अधिकारी कोण?

घूग्गूस न्यूज नेटवर्क :-

नुकत्याच घडलेल्या घूग्गूस येथील दिलीप फुटाणे यांच्या एकुलत्या एक शुभम नावाच्या अभियंता मुलाची हत्त्या ही समाजमनाला हादरे देणारी ठरली असून वेकोली च्या एका मोठ्या अधिकारी यांच्या मुलीसोबत शुभम चे प्रेमसंबंध हेच हत्या मागचे कारण असावे अशी चर्चा सद्ध्या जोरात सुरू आहे,

नागपूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या शुभमचे १७ जानेवारी २०२१ ला अपहरण करून तीस लाखाची खंडनी त्यांच्या वडिलांनी दिली नाही त्यामुळे गणेश पिंपळशेंडे यानी त्याची हत्या केली असे पोलिसांच्या तपासात उघड झाले असले तरी आरोपी गणेश साईनाथ पिपंळशेंडे हा एकटाच मारेकरी नसून त्याच्यासोबत आणखी त्याचे मित्र नक्कीच आहे, पण त्या मित्रांच्या वडिलांचे वेकोली मधे राजकीय वरदहस्त असल्याने विकृत मानसिकता असलेल्या गणेश या नराधामाला एकट्यालाच पोलिसांनी आरोपी बनविले असल्याची माहिती चर्चेतून बाहेर येत आहे,

पोलिसांना गणेश एका प्रेयसी सोबत सापडला होता नागपूरला?

शुभम ची हत्त्या करणारा गणेश याला पोलीस स्टेशनला या अगोदर बोलाविले होते तेंव्हा गणेश नी एसिड पिले होते. त्यामुळे पोलिसांना गणेश सायको असल्याचे वाटतं असल्याने त्याला शिताफीने पकडणे आवश्यक होते. पोलिसांनी त्याला  नागपूर च्या एका रूमवर प्रेयसीसोबत असतांना अतिशय शिताफीने अटक केली. काही महिन्यापूर्वी ह्याच माथेफिरूने वीर खारकर या ८ वर्षाच्या बालकांचे अपहरण करून नागपूरला सोडले होते. तेंव्हा पासूनच गणेश च्या प्रेयसीच्या चर्चा सुरु होत्या त्या आता खऱ्या ठरल्या असून तिच्या गरजा किंव्हा लाड पुरविण्यासाठीच गणेश ने शुभमची हत्त्या करण्याची सुपारी घेतली का? हा विषय सुद्धा महत्वाचा आहे त्यामुळे त्या प्रेयसीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले  तर या प्रकरणाचे खरे आरोपी समोर येऊ शकते.

शुभमला गणेश ने रात्री बोलवले त्यावेळी त्याचे काही मित्र पण होते अशी माहिती आहे, परंतु गणेश ने कुहाडीने डोक्यात सपासप वार करून शुभम ची हत्त्या केली व प्रेताची विल्हेवाट लावण्याकरिता बायपास मार्गावरील स्वागत लॉनच्या समोर काटेरी झुडपात प्रेत लपवून त्यावर विटाभटीची फ्लॅशआयची राख आणून टाकली जेणे करून या प्रेतचा सुगावा कोणास लागू नये अशी माहिती आरोपी गणेश ने पोलिसांना दिली त्यात त्यांनी पुढे म्हटले की दररोज तो या ठिकाणी पहाटे चार ते पाच च्या दरम्यान व रात्री सात ते आठ च्या दरम्यान जाऊन पाहायचा हे त्याच्या फोन चे टावर कनेकशन सायबर टीम नी डम्प डाटा मध्ये काढल्या नंतर माहीत झाले शिवाय गाडीवर शुभमच्या रक्ताचे डाग हे गणेश साईनाथ पिपंळशेंडे याचेच आहेत. हे फॉरेन्सिक लॅब मध्ये डीनए मध्ये निष्पन्न झाले. त्या वरूनच गणेश पिपंळशेंडे यास अटक झाली, गणेश ने शुभम फुटाणेचा फोन ज्या जमिनीवर पडलेल्या भेगा मध्ये टाकून दिला तो पोलिसांना त्या ठिकाणी दाखविला व ज्या कुर्हाडीने शुभम ची निर्घृण हत्या केली ती कुर्हाड झुडपात लपविलेली होती ती पण दाखवली, पण शुभम ला जिवन्त मारण्याचे कारण काय? ती कुर्हाड त्यांनी आणली कुठून? त्याच्यासोबत कोण होते? हे तो पोलिसांना अजूनपर्यंत का सांगत नाही? त्यामुळे या हत्तेमागे एक मास्टरमाईंड आहे का? व त्याच्यासोबत कोण हत्तेच्या वेळी मित्र होते? कारण ज्या पद्धतीने हत्त्या केली ती हत्त्या एकट्याने केली नाही हे स्पष्ट आहे त्यामुळे गणेश पिपंळशेंडे यांना कोणी सुपारी दिली? आणि एका वेकोली अधिकारी यांच्या मुलीसोबत शुभम चे खरोखरच प्रेमसंबंध होते आणि त्यामुळेच गणेश ने एक योजना आखून त्याचा खून केला का? असे नानाविध प्रश्न उभे राहत असतांना पोलीस तपासात मात्र काय निष्पन्न होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात तो वेकोली अधिकारी कोण? याचा तपास आम्हचे प्रतिनिधीं लवकरच लावणार असल्याने या गंभीर प्रकरणाला वेगळे वळण मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here