Home भद्रावती खळबळजनक ;- भावाने सख्ख्या चुलत बहिणी वर केला बलात्कार ?

खळबळजनक ;- भावाने सख्ख्या चुलत बहिणी वर केला बलात्कार ?

 

मुलीच्या आईने तक्रार देताच भद्रावती पोलिसांनी केली भावाला तत्काळ अटक.

भद्रावती प्रतिनिधी :-

कलियुगात कधी काय होईल हे साक्षात ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली असून नात्याचे पावित्र्य आता जणू इतिहासात जमा झाले असल्याचे चित्र दिसत आहे, आपल्या सख्ख्या चुलत वहिनीवर अत्त्याचार करून बहीण-भावाच्या पवित्र नात्याला कलंकीत करण्याची घटना भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत घडली असून आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम भावाला गजाआड केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भद्रावती तालुक्यातील निंबाळा येथील एक अल्पवयीन शाळकरी मुलगी तालुक्यातील लोणारा येथे आपल्या आजी-आजोबाकडे शिक्षणाकरीता राहात होती. दरम्यान ती भद्रावती येथील एका विद्यालयात शिकायला जात होती. लोणारा येथून ती रोज भद्रावतीला ये-जा करायची अशातच तिचा सख्खा चुलत भाऊ प्रेमकुमार दिलीप सोनटक्के (२४) रा. सोनेगाव हा सुद्धा भद्रावतीला रोज ये-जा करायचा. त्यामुळे ते दोघेही मिळून जायचे व यायचे. याच संधीचा फायदा घेऊन प्रेमकुमारने तिला डिसेंबर महिन्यात आपल्या गावी नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची कुठे वाच्यता केल्यास मी आत्महत्या करीन अशी धमकी दिली. त्यामुळे पिडीतेने कुठेही वाच्यता केली नाही. परंतु लोणारा येथे मुलीला बोलाविले असता प्रेमकुमार तिला नागपूरला घेऊन गेला व दोन दिवसांनी परत आला. घरच्या मंडळींनी त्यांची विचारपुस केली असता वरील माहिती उजेडात आली.त्यामुळे धक्का पौहचलेल्या पिडीतेच्या आईने भद्रावती पोलिसात धाव घेवून तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी लगेच तपासाची चक्र फिरवून नराधम भावाला गजाआड केले असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Previous articleधक्कादायक :- शुभम फुटाणे हत्त्या प्रकरणातील पोलीस तपासात होणार मोठा खुलासा?
Next articleखळबळजनक :- पेट्रोल डिझेल च्या माध्यमातून भरमसाठ कर लादून केंद्र व राज्य सरकारकडून जनतेची आर्थिक लूट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here