Home भद्रावती क्राईम स्टोरी :- भद्रावती पोलिसांनी केला पाच लाखांचा दारू जप्त पण आरोपी...

क्राईम स्टोरी :- भद्रावती पोलिसांनी केला पाच लाखांचा दारू जप्त पण आरोपी झाला फरार.

 

गुन्हे अन्वेषण विभागाची बेधड़क कारवाई.

उमेश कांबड़े ता.प्र भद्रावती :-

भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपुर चंद्रपुर मुख्य मार्गावरील कोंढा फाट्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पोलिसांनी पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले असता यातील वाहन चालक मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. मात्र वाहनात असणारा दारूसाठा पोलिसांनी जप्त करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

ही कारवाई पहाटे दरम्यान करण्यात आली असून नागपूर चंद्रपूर मुख्य मार्गाने दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे टप्पा परिसरात नाकाबंदी केली असता एम एच 40 ए 65 60 हे वाहन दारू घेऊन येत असताना पोलिसांची नाकाबंदी पाहून मागेच वळण घेऊन भरधाव वेगाने जात असताना पोलीसांनी पाटलाग केला ते वाहन कोंढा मार्गावर थांबवून यातील वाहन चालक पसार झाला पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात देशी विदेशी दारू किंमत पाच लाख व वाहन असा दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला .ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप, हेमराज प्रधान , शशांक बदामवार, केशव चिटगिरे, सचिन गुरनुले यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here