Home चंद्रपूर खळबळजनक :- नगरसेवक संदीप आवारी यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा पत्रकार परिषदेत मुलीचा...

खळबळजनक :- नगरसेवक संदीप आवारी यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा पत्रकार परिषदेत मुलीचा गौप्यस्फोट?

 

घराच्या जागेवरून वाद असल्याचा फायदा घेत अविवाहित युवतीची अब्रू लुटण्याच्या प्रयत्न?

चंद्रपूर प्रतिनिधी:-

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडे लोक मोठ्या अपेक्षेने जातात पण तेच जर जनतेच्या अब्रूवर हात घालत असतील तर मग लोकशाही खरंच धोक्यात आली आहे असे म्हणावे लागेल, त्यातच नगरसेवक म्हणजेचं प्रभागातील नागरिकांच्या हक्क अधिकारासाठी जात असेल तर मग अन्यायग्रस्तानी जायचं कुणाकडे? हा प्रश्न निर्माण होत आहे,असाच एक प्रकार चंद्रपूर शहरातील सरकार नगर येथे घडला असून भाजपचे नगरसेवक संदीप आवारी यांनी पाणी टंकी जवळ राहणाऱ्या अविवाहित युवतीचा मदत करतो म्हणून हात पकडून तिला शरीर सुखाची मागणी केली असल्याची खळबळजनक घटना घडल्याची कबुली स्वतः पीडित युवतीने पत्रकार परिषद घेवून केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीचे पाण्याच्या टाकी जवळ घर आहे, त्या घर व जागेचा मालकी हक्क सुद्धा आहे, पण त्या युवतीला तिच्या घरातूनच बाहेर हाकलण्याचा प्रयत्न सरकार नगर येथे राहणाऱ्या वंदना वानखेडे व गंगाधर वानखेडे हे करीत असून यामधे भाजप नगरसेवक संदीप आवारी यांचे त्यांना सहकार्य असल्याचा आरोप त्या युवतीने पत्रपरिषदेत केला.

युवतीच्या घराच्या जागेवर आमचा मालकी हक्क आहे असे नोटरी असलेले कागदपत्रे वंदना वानखेडे व गंगाधर वानखेडे हे दाखवत आहे, मात्र सदर युवतीकडे जागेचा मालकी हक्क असल्याचा पुरावा असल्याने वानखेडे यांनी जबरदस्ती त्या युवतीच्या घरी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात युवतीने तात्काळ या घटनेनंतर सरकारनगर प्रभागातील भाजपचे नगरसेवक संदीप आवारी यांना मदत मागितली मात्र या नगरसेवकाने चक्क त्या युवतीला शरीर सुखाची मागणी केली व तू माझी गोष्ट ऐकली तर मी सर्व सांभाळतो. अश्या प्रकारचे शब्द ऐकल्यावर ती संतापली व तिने रामनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली पण पोलिसांनी सुद्धा तिची तक्रार घेतली नसल्याने तिने आज पत्रपरिषद घेत पोलीस प्रशासन मला सहकार्य करीत नसून उलट माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.आज मी स्वतः घरून निघून जावे याकरिता संदीप आवारी व वानखेडे दाम्पत्य रोज मला धमकी देत आहे, माझ्या जीवाला धोका असून पोलीस प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी मागणी तिने पत्रपरिषदेत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here