Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील मामला येथे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन.

चंद्रपूर जिल्ह्यातील मामला येथे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन.

 

चंद्रपूर विकास खोब्रागडे:-

दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रतिबिंब बहुउद्देशीय संस्थेतर्फे चंद्रपूर तालुक्यातील मामला येथे पाककला चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, पाककला स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. ज्यात महिलांनी विविध पौष्टिक पदार्थ बनवण्याचे व या कृतीचे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरणाच्या काळात लहान मुलांनी मोबाईल खेळण्यात दिवस घालवण्यापेक्षा त्याच्या सर्वांगीण विकासामध्ये भर पडण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यात लहान मुलांनी सहभाग घेऊन रांगोळी व चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मेश्राम मॅडम तसेच चांदा पब्लिक स्कूलचे श्री खाडे सर मुलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले गायत्री चौधरी वैभव मंडलवार, हर्षदा कोकण वार यांना बक्षीस देण्यात आले त्याचप्रमाणे पाककला स्पर्धेत सुजाता रामटेके यांना हरभरा तर सुवर्णा जेंगठे याना दूधपरी तसेच रेखा चौधरी यांना पोस्टीक पदार्थासाठी बक्षीस देऊन गौरविण्यात आले, चित्रकला स्पर्धेचे बक्षीस देण्यात आले त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रंगारी सर यांनी केले कार्यक्रमाला गावातील आशा वर्कर प्रतिष्ठित व्यक्तीसह लहान मुलांनी मोठा सहभाग घेतला होता.

Previous articleखळबळजनक :- नगरसेवक संदीप आवारी यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा पत्रकार परिषदेत मुलीचा गौप्यस्फोट?
Next articleधक्कादायक ;- चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्यासह कुटुंबावर राजस्थानातील सिकर पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here