Home Breaking News धक्कादायक ;- चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्यासह कुटुंबावर राजस्थानातील सिकर पोलीस स्टेशन...

धक्कादायक ;- चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्यासह कुटुंबावर राजस्थानातील सिकर पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल.

 

पोलिसांशी दादागिरी आली अंगलट एका महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारी वरून आमदार भांगडिया यांच्यासह काहींना अटक .

न्यूज नेटवर्क :-

भांगडिया हे कुटुंबिय आपल्या नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. मात्र चुकीच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवीत जात असतांना राजस्थान पोलिसांनी गाडी अडवली असता आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी पोलिसांशी हुज्जत घातली त्या प्रकरणी त्याच्या वडिलांसह काही जणांविरूद्ध शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली असल्याने खळबळ उडाली आहे.

दुपारी बाराच्या सुमारास बसचालक सीकरजवळ भटकंती करून शहरात शिरला. शहरातील एसके हॉस्पिटल जवळ ट्रॅफिक महिला पोलिस कमला आणि हेडकॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनी बस थांबविली. तेथे हेड कॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनीही बस चालकाच्या जड वाहनात शहरात प्रवेश बंदी केल्याप्रकरणी 500 रुपयांचे चालान कापले. वाहनांची चौकशी केली असता, माझ्या बसची चौकशी का करता? मी महाराष्ट्राचा आमदार आहे. माझ्या वाहनांची तपासणी करायची नाही असे म्हणून राजस्थान पोलीसासोबत कीर्तिकुमार भांगडिया यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली, दरम्यान आमदार बंटी भांगडीया यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्दीला हात लावताच दोघात हातापायी झाल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्या सोबत अश्लील शब्दात शिवीगाळ करून तिला धमकी दिली. शिवाय हेडकॉन्स्टेबल गिरधारीसिंगचा गणवेश फाडून त्यांच्या गळ्यावर आणि हातावर वार केले.त्यामुळे आमदार कीर्ति कुमार, मितेश भांगडिया यांनी कायदा सुव्यवस्था बिघडविने , हल्ला करण्याचा प्रयत्न करणे व शांततेचा भंग केल्या प्रकरणी महिला कॉन्स्टेबल कमला यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे

Previous articleचंद्रपूर जिल्ह्यातील मामला येथे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन.
Next articleक्राईम न्यूज :- शुभम फुटाणे हत्त्याकांडचा मुख्य आरोपी खोटा बोलतोय, आणखी आरोपी पोलीस कधी शोधणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here