Home चंद्रपूर क्राईम न्यूज :- शुभम फुटाणे हत्त्याकांडचा मुख्य आरोपी खोटा बोलतोय, आणखी आरोपी...

क्राईम न्यूज :- शुभम फुटाणे हत्त्याकांडचा मुख्य आरोपी खोटा बोलतोय, आणखी आरोपी पोलीस कधी शोधणार?

 

पोलिसांची दिशाभूल? करणाऱ्या गणेश पिंपळशेंडे ह्या आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने इतर आरोपींचा शोध थांबला?

घूग्गूस प्रतिनिधी :-

घूग्गूस येथील रामनगर वेकोली वसाहतीत राहणाऱ्या शुभम दिलीप फुटाणे हत्याकांडात अटकेत असलेल्या आरोपीकडून नवनवीन खुलासे होत असल्याचे पोलीस तपासात बोलले जात आहे, मात्र त्या हत्त्याकांडात केवळ गणेश पिंपळशेंडे हा एकटाच आरोपी नसून आणखी आरोपी सामील असल्याची जोरदार चर्चा असल्याने व शुभम ची हत्त्या प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन झाल्याची चर्चा असल्याने हे प्रकरण अतिशय गंभीर बनले आहे, मात्र आता मुख्य आरोपी गणेश याची न्यायालयीन कोठडी जाहीर झाल्याने पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने जाईल याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गणेश पिंपळशेंडे याने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले की शुभम फुटाणे यांच्या वडिलांना शेतीच्या विक्रीतून तीस लाख रुपये मिळणार होते. त्यातील दहा लाख रुपये शुभमच्या वडीलानी घरी आणले असल्याचे शुभमला माहीत होते. शुभमने गणेश सोबत दारू पीत असतांना अपहरणाची ऑफर दिली. दहा पैकी सात लाख मी ठेवतो व तीन लाख तुला देतो असे सांगितले दरम्यान दोघात बाचा – बाची होऊन झालेल्या मारहाणीत शुभमचा मृत्यू झाला. पण शुभम हा गणेश ला पैसे का म्हणून देत होता? मग जर केवळ दारू पिताना झगडा झाला तर आरोपी कडून जी कुर्हाड जप्त करण्यात आली ती आरोपींनी आणली कुठून? व जर दोघांच्या भांडणात जर शुभम चा मृत्यू झाला तर त्यावेळी पुन्हा कुणी उपस्थित नव्हते का? शिवाय गणेश पिपळशेंडे हा एकटा शुभमला ठार ठार मारून त्याच्या बॉडीची विल्हेवाट लावण्यास समर्थ होता का? दरम्यान दोघेही ज्याअर्थी दारू पीत होते त्यावेळी कुणीही बघितले नसेल का? इत्यादी प्रश्न उपस्थित होत असून मूळ घटनेला दिशाहीन करण्यासाठी ही स्टोरी गणेश च्या तोंडून कोण सांगतोय? याचा तपास खरं तर पोलिसांनी घ्यायला हवा होता पण या घटनेला रफादफा करण्यासाठी ही स्टोरी तयार तर केली नसावी? याची शंका बळावत असून या हत्त्याकांडात आणखी आरोपी असून हा सुनियोजित मर्डर आहे असेच एकूण या हत्त्याकांडातील एकूण घटनांचकावरून दिसून येते. कारण शुभम चे एका वरिष्ठ वेकोली अधिकारी यांच्या मुलीसोबत असलेले प्रेमसंबंध व आरोपी गणेश याचे एका प्रेयसी सोबत नागपूरला पकडणे जाणे म्हणजे गणेश ला त्या वेकोली अधिकाऱ्यांकडून मोठी रक्कम मिळाली व त्यातून तो अय्याशी करण्यासाठी नागपूरला आपल्या प्रेयसी सोबत होता हे आता स्पष्ट होत आहे याचा तपास जरी पोलीस लावू शकले नाही तरी या प्रकरणात एक एजन्सी छडा लावण्यासाठी गोपनीय माहिती घेत असल्याने काही दिवसातच या प्रकरणी ते इतर आरोपी पोलिसांच्या रडारवर येईल अशी चिन्हे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here