Home भद्रावती दे दणका ;- सहाय्यक तालुका निबंधक पोथारे हेच खरे भ्रष्टाचारी,यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी...

दे दणका ;- सहाय्यक तालुका निबंधक पोथारे हेच खरे भ्रष्टाचारी,यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी आवश्यक?

 

आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्था संचालकांवर त्यांनी कारवाई का टाळली?

भ्रष्टाचारी संचालक समिती भाग-३

आयुध निर्माणी कर्मचारी पत संस्था भद्रावती जिल्हा चंद्रपूर र.ज.131 मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता, मात्र संचालक समिती आपले आर्थिक व्यवहार लपवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते, खरं तर 2700 सभासदांच्या पैशाचा योग्य विनियोग जर होत नसेल तर अशा संचालक समितीच्या भ्रष्टाचाराला आळा घालणे आवश्यक आहे, आणि म्हणून मागील 2-3 वर्षांपासून संचालक समिती कडून जो आर्थिक गैरव्यवहार होत होता त्याच्या  तक्रारी सहाय्यक तालुका निबंधक कार्यालय भद्रावती येथे सभासदांकडून वारंवार करण्यात आल्या पण सहाय्यक निबंधक यांच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांनी नेहमीच टाळाटाळ केली.

चांदा आयुध निर्माणी मधे या पत संस्थेच्या संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराची चर्चा होत असल्याने व शेवटी सभासदांचा दबाव वाढल्याने सहाय्यक तालुका निबंधक पोथारे यांनी  ह्या प्रकरणी चौकशी लावली ती चौकशी पूर्ण करुन चौकशी अहवाल उपलेखापरिक्षक रवी मांढळकर यांनी दि.२५|११|२०१९ ला सहाय्यक निबंधक कार्यालय भद्रावती येथे सादर केला. या चौकशी अहवालात संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले व त्यांच्यावर फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात आली.पण १-२ महिने सहाय्यक निबंधक भद्रावती यांचे कडून चौकशी अहवालावरती कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. पर्यायाने संचालक समितीला आपला भ्रष्टाचार लपविन्यासाठी वेळ मिळाला आणी उपलेखानिरिक्षक रवी मांढळकर यांनी त्यांच्या अहवालात 57.92 लाख रुपयांचा जो भ्रष्टाचार उघड केला होता आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे असे नमूद केले होते त्याकडे दुर्लक्ष करून भ्रष्ट सहाय्यक निबंधक यांनी दुसरा अहवाल सादर करण्यासाठी उपलेखानिरिक्षक श्रेणी -२ श्रीकोंडावार यांच्याकडे जबाबदारी दिली, परंतु दुसऱ्या अहवालात श्रीकोंडावार या महिला अधिकारी यांनी कुठल्याही पुराव्यानिशी अहवालात खूप बदल केले आणि संचालकावर नाममात्र  रिकव्हरी लावून त्या भ्रष्टाचारी संचालकांना पाठीशी घालून त्यांचा भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न केला. यामधे सहाय्यक तालुका निबंधक पोथारे यांची मोठी भूमिका असून सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांच्या भ्रष्टाचारात यांनी लाखो रुपयाची लाच घेऊन संचालक मंडळांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक उदाहरण समोर येत आहे. त्यामुळे खरे तर सहाय्यक तालुका निबंधक पोथारे यांचा भ्रष्टाचाराची प्रथम चौकशी होणे आवश्यक झाले आहे.

Previous articleधक्कादायक :- देशातील सैन्य भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रद्द.
Next articleदुःखद घटना :- एका प्रेमी युगलांनी केली रेल्वे रुळावर आत्महत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here