Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूरातील जायका हॉटेल ला लागली आग लाखोंचे झाले नुकसान.

धक्कादायक :- चंद्रपूरातील जायका हॉटेल ला लागली आग लाखोंचे झाले नुकसान.

 

आग कशामुळे लागली याचे ठोस कारण अजूनही नाही आले समोर.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरात अगदी मुख्य रस्त्यावर असलेल्या जायका हॉटेलला भीषण आग लागून या आगीत जवळपास ५० ते ६० लाखांचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही कशामुळे लागली याची प्राथमिक चौकशी झाल्यानंतरच कळेल मात्र ही आग शॉर्ट सर्किट ने लागल्याची माहिती हॉटेल मालक मसूद खान यांनी दिली आहे.

शहराच्या मध्यभागी असलेल्या हॉटेल जायकाला अचानक रात्री १.३० च्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती नागरिकांनी हॉटेल मालक मसूद खान यांना दिली. त्यानंतर हॉटेल मालक यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली असता अग्नीशमन दल पोहचत नाही तो पर्यंत संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले होते. या आगीत जवळपास ५० ते ६० लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

Previous articleस्तुत्य उपक्रम :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा वरोरा तर्फे उभारला आनंदवन चौक प्रवासी निवारा.
Next articleक्राईम न्यूज :- ऑनलाईन जुगारात पैसे हरलेल्या तरुणांची आत्महत्या?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here