Home वरोरा स्तुत्य उपक्रम :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा वरोरा तर्फे उभारला आनंदवन चौक...

स्तुत्य उपक्रम :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा वरोरा तर्फे उभारला आनंदवन चौक प्रवासी निवारा.

 

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र सैनिकांचा स्तुत्य उपक्रम.

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेत्रूत्वात वरोरा शहर व तालुक्यात अनेक आंदोलने व कार्यक्रमाचे आयोजन होत असून आता वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे मनसे तर्फे पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तात्पुरता प्रवाशी निवारा तयार करण्यात आला आहे. आनंद निकेतन विद्यालय, महाविद्यालय, कृषी विद्यालय येथे बाहेर गावातून शिकायला येत असलेल्या विद्यार्थ्याना व जाणारे प्रवाशांना देखील याच ठिकाणी बस ची प्रतीक्षा करावी लागत होती मात्र या ठिकाणी प्रवाशी निवारा नसल्याने रखरखत्या उन्हात बस च्या प्रतीक्षेत उभे राहावे लागत होते.

मागील काही महिन्याआधी आनंदवन चौक कडून नागपूर जाणाऱ्या दिशेला असलेला प्रवासी निवारा एका अपघातात पडला त्यानंतर कोणीही त्या प्रवासी निवाऱ्याकडे लक्ष दिले नाही.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही समस्या लक्षात येताच त्यावर उपाय म्हणून मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत बदकी,कल्पक ढोरे ,सचिन मांडवकर , विशाल यादव,तुषार कळसकर व नितीन सुरसे या महाराष्ट्र सैनिकांनी या निवारा तयार केला.या प्रवासी निवाऱ्यामुळे या मार्गाने जाणारे प्रवासी शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध यांना सावली मिळणार आहे .जे काम स्थानीय प्रशासनाने करायला हवं ते काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा ही कायम जनतेच्या सेवेसाठी कोणत्याही स्वार्थविना काम करत राहील असे तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी ना सांगितले.

Previous articleधक्कादायक ;- पाकिस्तानमधे पेट्रोल ३०रुपयांनी आणि डिझेलची किंमत ४३रुपयांनी कमी मग भारतात एवढी कशी ?
Next articleधक्कादायक :- चंद्रपूरातील जायका हॉटेल ला लागली आग लाखोंचे झाले नुकसान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here