ज्या दुकानातून ही बिले आली त्यांच्यावर पण कारवाई होण्याची शक्यता?
भ्रष्टाचारी संचालक भाग – ५
चांदा आयुध निर्माणीतील आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्था ही संचालकांच्या भ्रष्टाचारांचा अड्डा बनली असून या संस्थेचे सत्ताधारी संचालक मंडळ हे या पत संस्थेतील तब्बल २७०० सदस्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे आता जवळजवळ शीद्ध होत आहे. खरं तर संचालक मंडळाची निवडणूक ही संस्थेच्या प्रगती करिता व त्या संस्थेतील सभासदांच्या आर्थिक हिता करिता एक जबाबदार व्यक्तीच्या निवडी करिता होत असते पण संचालक मंडळ जर स्वतःच संस्थेच्या सभासदांना अंधारात ठेवून जर कमिशनसाठी प्रत्त्येक वस्तूच्या खरेदीत व कामात संस्थेच्या पैशाची लूट करीत असेल तर अशा संचालकांवर पैशाची अफरातफर केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल व्ह्यायलाच हवे पण शोकांतिका अशी आहे की जिथे सरकारी यंत्रणाच भ्रष्ट झाली असेल तिथे कारवाई होणार ती कुणावर? असा प्रश्न आता पडायला लागला आहे.
आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष
मानद सचिव व संचालक मंडळावर जवळपास 57.92 लाखांच्या उधळपट्टी चा ठपका ठेऊन तीन प्रकरणात फौजदारी कारवाई व एका प्रकरणात प्रशासकीय कारवाई करण्याचा अहवाल सहाय्यक निबंधक भद्रावती यांच्याकडे सोपविण्यात आला होता पण अगोदरच भ्रष्टाचारात बहादुर असलेल्या सहाय्यक तालुका निबंधक पोथारे यांनी भ्रष्ट संचालकांना वाचविण्यासाठी त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली नाही व त्यांना विभागीय निबंधकाकडे जाण्याचा मार्ग दाखवला त्यामुळे आता भ्रष्ट संचालक मंडळ वाचेल अशी अपेक्षा असतांना रुद्राक्ष फेब्रिकेशन, अथर्व कॉम्पुटर भद्रावती, चांदा प्लायवूड चंद्रपूर, ओरमॅक्स हेल्मेट दिल्ली, विनापरवानगी बांधकाम इत्यादींची बोगस बिलांची माहिती, माहिती अधिकार अधिनियमां अंतर्गत भागधारक सदस्यांनी काढल्याने त्या माहिती नुसार भ्रष्ट संचालक मंडळांची पोल खुलली असून बोगस बिल, ऑडिट रिपोर्ट, लेखा चाचणी, सहकार नियमावली इत्यादीचे दस्तऐवज हे आता बोलायला लागले आहे. यामुळे सत्ताधारी संचालक मंडळाने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याने ते गोत्यात येवून त्यांच्यावर उच्च न्यायालयातून फौजदारी कारवाई नक्कीच होईल असे चिन्ह आता दिसू लागले आहे. सोबतच ज्या दुकानदारांकडून सामान खरेदी करून बोगस बिले घेतली त्या दुकानदारांवर सुद्धा कारवाई होणार असल्याची चर्चा होत आहे.