Home वरोरा स्तुत्य उपक्रम :- गांधी योग मंडळातर्फे ” स्वर्गरथ ” चे लोकार्पण...

स्तुत्य उपक्रम :- गांधी योग मंडळातर्फे ” स्वर्गरथ ” चे लोकार्पण व सेवेत रुजू

 

महाशिवरात्रीच्या पावणपर्वावर नावीन्यपूर्ण उपक्रमांची शहरात सर्वत्र चर्चा.

 वरोरा वृत्तसेवा;-

समाजकार्याचे व विधायक कार्याचे व्रत घेतलेल्या  नेहमीच  शहरातील गांधी उद्यान योग मंडळाने महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर एक नाविन्यपूर्ण उपक्रम “स्वर्गरथ” च्या माध्यमातून नगरवासियांच्या सेवेत रूजू केला. येथील गांधी उद्यान योग मंडळातर्फे दरवर्षी गुढीपाडवा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो परंतु गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव होऊ शकला नाही. त्यामुळे त्यासाठी जमलेल्या निधीतून शहरवासीयांच्या सेवेत “स्वर्गरथ”  अर्पण करून एक आगळावेगळा उपक्रम सुरु केल्याने नागरिकातर्फे योग मंडळाचे कौतुक होत आहे. .
गांधी उद्यान योग मंडळ व गुढीपाडवा आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ११ मार्चला महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर येथील आंबेडकर चौकात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात माजी नगरसेवक खेमराज कुरेकार यांच्या हस्ते पूजन करून” स्वर्गरथाचे ” लोकार्पण करण्यात आले.यावेळी येथील व्यवसायिक ग्यानचंद मालू , योगगुरू प्रकाश संचेती व शालीक बदखल उपस्थित होते.

गांधी उद्यान योग मंडळातर्फे तीन स्टीलच्या तिरड्या व चार आॅक्सीजन सिलेंडर शहरवासीयांसाठी उपलब्ध देणार असल्याचे जाहीर करताच चेतन चंदन शर्मा यांनी दोन तिरड्यासाठी ११००० रूपये तर विजय गोटे यांनी आॅक्सीजनच्या एका सिलेंडरसाठी निधी देण्याचे जाहीर केले. यामुळे चेतन शर्मा, विजय गोटे तसेच शहरातील तरुणांना मोफत सैनिकी प्रशिक्षण देत असलेल्या माजी सैनिक सागर गणपत कोहळे या मान्यवरांचा मंडळातर्फे शाल, श्रीफळ व मंडळाचे टी शर्ट देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे मावळते अध्यक्ष खेमराज कुरेकार यांनी नवनियुक्त अध्यक्ष नितेश उर्फ दादा जयस्वाल यांना अध्यक्षपदाचे सुत्रे सोपविली व त्याचा सत्कार केला.
गुढीपाडवा उत्सवासाठी मागील वर्षी जमा झालेला निधी स्वर्गरथासाठी खर्च करण्यात आला असून श्याम टोकसिया हे स्वर्गरथाची देखभाल करणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र नेमाडे , आनंद गुंडावार , मनोज कोहळे, जयंत मारोडकर, प्रवीण सुराणा, प्रमोद नांदे सुनील बांगडे सर, शैलेश शुक्ला व गांधी उद्यान योग मंडळाच्या समस्त सभासदाचे सहकार्य लाभले.

Previous articleधक्कादायक :- आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या सामान खरेदीची बोगस बिले आता बोलू लागली?
Next articleशैक्षणिक :- MPSC ची परिक्षा लांबणीवर टाकण्याचा आततायी निर्णय घेऊ नये,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here