Home महाराष्ट्र शैक्षणिक :- MPSC ची परिक्षा लांबणीवर टाकण्याचा आततायी निर्णय घेऊ नये,

शैक्षणिक :- MPSC ची परिक्षा लांबणीवर टाकण्याचा आततायी निर्णय घेऊ नये,

मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा उद्धव ठाकरे सरकारला सल्ला.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

MPSC ची परिक्षा लांबणीवर टाकणे म्हणजे एवढी दिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना एक प्रकारे वाळीत टाकन्यासारखे आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेता MPSC ची परिक्षा लांबणीवर टाकण्याचा आततायी निर्णय सरकारने
घेऊ नये, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटर वरून सरकारला दिला आहे.

कोरोना हा आता लवकर संपेल अशी शाश्वती नाही मग असे किती दिवस तयारी केलेल्या मुलांना मुलींना सरकार अधांतरी ठेवणार आहे? असा सवाल करून कोविड चे सर्व प्रकारचे नियम पाळून हि परिक्षा घेणे जास्त उचित ठरले असते असे बाळा नांदगावकर यांनी सरकारला सुचविले आहे पुढे ते म्हणतात की एकीकडे माझे कुटुंब, माझी जवाबदारी म्हणता ना? मग या मुलांची जवाबदारी सरकारची नाही का? नियमात भेदभाव का? असा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे. अर्थात MPSC ची परिक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागला असून सरकारच्या निर्णयाचा विद्यार्थी सर्वत्र निषेध करीत आहे.

Previous articleस्तुत्य उपक्रम :- गांधी योग मंडळातर्फे ” स्वर्गरथ ” चे लोकार्पण व सेवेत रुजू
Next articleखळबळजनक :- विधवा महिलेच्या प्रेमात अविवाहित तरुणाची विधवेसह आत्महत्या?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here