Home Breaking News खळबळजनक :- विधवा महिलेच्या प्रेमात अविवाहित तरुणाची विधवेसह आत्महत्या?

खळबळजनक :- विधवा महिलेच्या प्रेमात अविवाहित तरुणाची विधवेसह आत्महत्या?

 

प्रेमाच्या गावात बाराच्या भावात पण त्या महिलेच्या मुलांचे काय?

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

“प्रेमाला उपमा नाही हे देवाघरची नाती” असे म्हटल्या जाते तर दुसरीकडे प्रेमाला वय नसतं असं पण म्हटल्या जात मात्र प्रेमाच्या या लफड्यात बिचाऱ्या छोट्या मुलांचे काय? हा प्रश्न अतिशय गंभीर असून केवळ शारीरिक सुख्याच्या नशेत स्वतःच्या मुलांची काळजी न करणाऱ्या त्या प्रेमवीरांना खरं तर समाजातूनच हद्दपार करायला हवं अशाच एका प्रेमाच्या चक्रव्यूहात फसलेल्या प्रेमवीराची कहाणी समोर आली असून प्रेम प्रकरणातून विधवा महिलेसह एका अविवाहित तरूणाने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा येथील निर्वाण घाटावर गुरूवारी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली त्यामुळे या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कुंदा रमेश कुंभलकर (३३) आणि नाशिक महादेव बावनकुळे (२८) रा. शुक्रवारी भंडारा अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार भंडारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या दिवाणघाटावर महिलेचा मृतदेह आढळून आला. तिची ओळख पटविली असता ती कुंदा कुंभलकर असल्याचे पुढे आले. त्याच परिसरात पोलिसांनी शोध घेतला असता दुपारी ३.३० वाजता नाशिकचाही मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दोनही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहे. कुंदा ही एका किराणा दुकानात कामाला होती. तिला १४ वर्षाचा मुलगा आणि ११ वर्षाची मुलगी आहे. तर नाशिकचे भाजीपाल्याचे दुकान असून तो अविवाहीत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, भंडाराचे ठाणेदार लोकेश कानसे, पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांनी भेट दिली. या घटनेची माहिती शहरात पसरताच अनेकांनी दिवाणघाटाकडे धाव घेतली होती.

Previous articleशैक्षणिक :- MPSC ची परिक्षा लांबणीवर टाकण्याचा आततायी निर्णय घेऊ नये,
Next articleमनसेच्या १५ व्या वर्धापनदिनी मनविसेची चित्रकला स्पर्धा संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here