Home नागपूर मनसेच्या १५ व्या वर्धापनदिनी मनविसेची चित्रकला स्पर्धा संपन्न.

मनसेच्या १५ व्या वर्धापनदिनी मनविसेची चित्रकला स्पर्धा संपन्न.

राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांची उपस्थिती, मनविसे नागपूर जिल्हाध्यक्ष यांचा पुढाकार

नागपूर न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १५ व्या वर्धापनदिनी महाराष्ट्र सैनिकांनी अनेक उपक्रम व कार्यक्रम राबविले त्यातच कोरोना काळात लहान मुले हट्टाने घरातील मंडळींचा मोबाईल फोन घेऊन त्यावर खेळण्यात मग्न असतात त्यामुळे त्यांच्यात असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळत नाही ही मुले मैदानाकडे सुद्धा धाव घेत नाही एवढे ते मोबाईल मग्न झालेले असतात , अश्या मोबाईल प्रेमाने ग्रस्त मुलांना मनसेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य* चित्रकला स्पर्धा आयोजित करून त्यांच्यातील दडलेल्या गुणांना वाव दिल्याबद्दल *मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी* यांनी या स्पर्धेचे आयोजक *मनविसेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष दिनेश इलमे यांचे अभिनंदन केले, या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला हेमंत गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांच्यासोबत शहर अध्यक्ष अजय ढोके, उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, मनविसेचे विदर्भ प्रभारी आदित्य दुरुगकर, मनसेचे दक्षिण पश्चिम सचिव तुषार गिर्हे, उद्योगपती इंद्रजीत सिंग भोगल उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मनविसेचे सचिव दीपक उज्जेनकर तर आभार प्रदर्शन उत्तर विभाग अध्यक्ष मनोज काहलकर यांनी केले स्पर्धेतील प्रथम क्रमांक लावण्या डोंगरे, द्वितीय क्रमांक .ऋषीता आंबोकार तर तृतीय क्रमांक इशमीत कौर अरोरा* पटकावला, तर चतुर्थ बक्षीस … *मेधानश ईलमे यांना मिळाले, स्पर्धेत सहभागी सर्वाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, या स्पर्धेच्या आयोजनासाठी दिनेश इलमे* यांचे सोबत .करण ,रवी रेड्डी, संतोष ,गोलू, मुकेश आदि.यांनी परिश्रम घेतले

Previous articleखळबळजनक :- विधवा महिलेच्या प्रेमात अविवाहित तरुणाची विधवेसह आत्महत्या?
Next articleक्राईम स्टोरी :- चांदा रयतवारी कॉलरी परिसरात खुलेआम विकल्या जातो गांजा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here