Home चंद्रपूर क्राईम स्टोरी :- चांदा रयतवारी कॉलरी परिसरात खुलेआम विकल्या जातो गांजा?

क्राईम स्टोरी :- चांदा रयतवारी कॉलरी परिसरात खुलेआम विकल्या जातो गांजा?

बंगाली कैम्प पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर विकल्या जातेय दारू?

चंद्रपूर न्यूज नेटवर्क :-

चंद्रपूर शहरातील चांदा रयतवारी कॉलरी परिसरात अवैध गांजा विक्रीचा धंदा जोरात सुरू असून पोलिसांच्या हप्तेखोरीने गांजा तस्कर हे बेकाबू झाले की काय? अशी शंका येत आहे.या परिसरात मागील कित्तेक वर्षापासून विलास नामक व्यक्ती व अज्जू भाभी आणि पौचम्मा झाडे ह्या महिला दररोज मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीचा व्यवसाय करतात अर्थात पोलिसांना इथून हप्ते तर जात असतीलच त्यामुळेच हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे.

कालच संजय नगर येथील एका रेखा नामक महिलेला अवैध गांजा विक्रीचा व्यवसाय उघडकीस आला असून तिला अर्धा किलो गांजा सह अटक करून दारूची अर्धा पेटी दारू जप्त करण्यात आली पण त्या महिलेने जवळपास पन्नास हजार रुपये हे पोलिसांना दिल्याची चर्चा असून बंगाली कैम्प पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर दारू विकल्या जात असल्याची खात्रीलायक बातमी असून लालू व शंकर नामक दोन व्यक्ती ह्या अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची चर्चा असून पोलीस नेमके करतात काय? हा गंभीर प्रश्न आहे.

Previous articleमनसेच्या १५ व्या वर्धापनदिनी मनविसेची चित्रकला स्पर्धा संपन्न.
Next articleकोरोना विशेष :- महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here