Home महाराष्ट्र कोरोना विशेष :- महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये.

कोरोना विशेष :- महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये.

 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांची उद्धव ठाकरे सरकारकडे मागणी.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे याचे लॉजिक सरकारतर्फे देण्यात येत आहे की ते राज्य कमी चाचण्या करतात पण सरकारने असे कारण देण्यापेक्षा आपल्या राज्यातील मृत्युदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करायला हवे. कारण आधीच आर्थिक दृष्टया त्रस्त जनतेला लॉक डाउन करून अडचणीत आणणारा आहे व त्यामुळे राज्य सरकारने सरसकट लॉक डाउन चा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये. त्यापेक्षा नियमावली ची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटर च्या माध्यमातून उद्धव ठाकरे सरकारकडे केली आहे.

खरं तर बाकी अनेक राज्यात जे आपल्या महाराष्ट्रा पेक्षा अनेक अर्थाने मागे आहेत तिथे मृत्यू दर हा अतिशय कमी आहे हा सरकार साठी संशोधनाचा विषय आहे. ज्या पश्चिम बंगालमधे निवडणूक आहे तिथे कोरोना नाही, गुजरात ला क्रिकेट बरोबर सुरू आहे, दिल्ली ला बिना मास्क अधिवेशन होत आहे मग महाराष्ट्रातच लॉकडाऊन का?असा प्रश्न ट्विटर वर अनेकांनी सरकारला विचारला आहे. त्यात पुन्हा म्हटले गेले की तीन चाकी सरकारची अशी इच्छा नाही की कोरोना लवकर जावा कारण हे सरकार पुर्ण पणे अपयशी ठरले आहे. कोरोनावर लस उपलब्ध होऊन सुद्धा लॉकडाऊन ची गरज काय? गरीब माणसाला भिकेला लावायचे काम केंद्रात आणि राज्यातले दोन्ही सरकार करत आहे.असा आरोप सुद्धा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here