Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यातील जवान निखिल श्रावण बुरांडे यांनी केली आग्रा येथे...

धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यातील जवान निखिल श्रावण बुरांडे यांनी केली आग्रा येथे आत्महत्या?

 

बल्लारपूर तालुक्यातील मानोरा गावात पसरली शोककळा आत्महत्तेचे कारण अस्पष्ट.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात असलेल्या मानोरा या गावात मूळ रहिवासी असलेला जवान निखिल श्रावण बुरांडे (25) यांनी आग्रा येथील सैन्य कॅन्टोनमेंट परिसरातील राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून मानौरा या गावात शोककळा पसरली आहे.

आग्रा येथे पॅराकमांडो फोर्स मधे सामील निखिल श्रावण बुरांडे हे पॅराकमांड म्हणून कार्यरत होते. अतिशय मेहनतीने त्यांनी इथपर्यंत मजल मारल्यानंतर अचानक त्यांनी आत्महत्या करावी हे परिवारातील व गावातील लोकांच्या पचनी पडणारी बाब नसून ही नेमकी आत्महत्या आहे की घातपात याची चौकशी होणे गरजेचे आहे पण आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज मानोरा येथे त्यांचे पार्थिव शरीर आणले जाणार असून तेथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here