वाढत्या आत्महत्या सामाजिक व्यवस्थेला छेद देणाऱ्या ठरताहेत?
भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-
जिल्ह्यात युवकांच्या वाढत्या आत्महत्या ह्या सामाजिक व्यवस्थेला छेद देणाऱ्या ठरत असून युवकांमध्ये आलेली नैराश्य व्रुत्ती आणि हतबलता हीच आत्महत्तेस कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.त्यातच बल्लारपूर शहरात विविध कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असतांनाच बल्लारपूर शहरात किल्ला वॉर्ड बल्लारपूर येथे भगतसिंग रामसिंग बैस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आधीच अवघ्या 2 दिवसांपूर्वी एका 12 वर्षीय निरागस मुलीचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला त्या दूख्खातून बाहेर पडते न पडते तोच आज बल्लारपूर शहरातील दोन तरुणांनी विविध वॉर्डात आत्महत्या केल्याच्या चिंताजनक घटना उघडकीस आल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार बुधवारी सायंकाळी 8:00 वाजताच्या सुमारास बालाजी वॉर्ड निवासी असलेले स्व नरसय्या येनगन्धलावार (नगरसेवक) यांच्या आजारपणामुळे झालेल्या मृत्यूमुळे वडिलांच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यामुळे त्यांचा मुलगा राजू नरसया येनगन्धलावार वय – 28 वर्ष यांनी घराच्या बाथरूम मध्ये हार्पिक पिऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे तर दुसऱ्या घटनेत रवींद्र वॉर्ड बल्लारपूर येथील शुभम राजू बहुरीया वय – 26 वर्ष आपल्या आईला घराच्या वरच्या खोलीत झोपायला जायचे कारण सांगून गेला असता खोलीत दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला असल्याची माहिती आज उघडकीस आली आहे या दोन्ही घटनांचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे, मात्र तरुण युवकांच्या आत्महत्त्या यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.