Home भद्रावती लक्षवेधक :- आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या संचालकांना उच्च न्यायालयाचा दणका?

लक्षवेधक :- आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या संचालकांना उच्च न्यायालयाचा दणका?

 

रवी माढळकर यांच्या अहवालाच्या शिफारशीनुसार संचालकांवर होणार कारवाई?

भ्रष्ट संचालक समिती भाग-७

सहकार क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार हा जणू शिष्टाचार झाला की काय ?असा प्रश्न उभा राहत असून या क्षेत्रातील जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक व लेखापरीक्षण अधिकारी यांच्या भ्रष्ट नितीमुळे सहकारी बैंक व पत संस्थेच्या संचालकांना आर्थिक गैरव्यवहार करण्याचे बळ मिळत आहे. आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्था ही त्यातलीच एक संस्था असून इथे तब्बल ५७ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद केल्यानंतर सुद्धा तत्कालीन तालुका सहाय्यक निबंधक जिल्हा उपनिबंधक यांनी भ्रष्ट संचालकांवर कारवाई केली नाही, त्यामुळे रवी माढळकर यांच्या अहवालाच्या शिफारशीनुसार संचालकांवर कारवाई करण्यासंदर्भात येथील पत संस्थेचे सभासद यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली दरम्यान  त्या संदर्भात सहाय्यक तालुका निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांना उच्च न्यायालयातून नोटीस मिळाले असतांना देखील प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना विभागीय सहनिबंधक यांच्या माध्यमातून श्रीकोंडावार यांच्याकडे पुन्हा लेखापरीक्षण अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आणि संचालकांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

रवी माढळकर यांच्या लेखा परीक्षण अहवालाच्या शिफारशीनुसार संचालकांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश आता उच्च न्यायालय मुंबई च्या नागपूर खंडपीठाने अपील क्रमांक ७६/२०२० वर दिनांक २/३/२०२१ ला काढला असून यामुळे आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या संचालकांवर कारवाई होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. सोबतच जर तालुका सहाय्यक निबंधक पोथारे आणि जिल्हा उपनिबंधक खाडे यांनी या प्रकरणी संचालकांवर कारवाई न केल्यास त्यांच्यावर सुद्धा न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कारवाई होऊ शकते, त्यामुळे संस्थेच्या २७०० सभासद भागधारक यांच्या पैशाची जी अफरातफर किंव्हा गैरव्यवहार सत्ताधारी संचालकांनी साहित्य खरेदी, बांधकाम व इतर बाबी तून केला त्या पैशाची वसुली त्यांच्याकडून होणार असल्याने संस्थेच्या कामकाजात आता पारदर्शीपणा येण्यास वाव मिळेल आणि कुणी या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार करणार नाही असे चिन्ह दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here